
टेनिस स्टार सानिया मिर्झा कायमच चर्चेत राहणारे एक नाव सानिया मिर्झाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सानिया हिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत लग्न केले. मात्र, हे लग्न फार काळ टीकू शकले नाही. सानिया आणि शोएब मलिक यांचा एक मुलगा असून घटस्फोटानंतर सानिया मुलाचा सांभाळ करते. महिन्यातून एकदा मुलगा इजहान याला भेटण्यासाठी शोएब मलिक दुबईला जातो. सानिया आणि शोएब यांनी लग्नानंतर दुबई राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, घटस्फोटानंतर शोएब मलिकने दुबई सोडली आणि तो पाकिस्तानमध्ये अभिनेत्री आणि तिसरी पत्नी सना मलिक हिच्यासोबत राहतो. सानिया मिर्झा घटस्फोटानंतर तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य करताना फार कमी वेळा दिसली.
आता घटस्फोटाला काही महिने झाल्यानंतर ती घटस्फोटावर भाष्य करताना दिसतंय. सानिया आणि शोएब मलिक यांचे लग्न 2010 मध्ये झाले. त्यानंतर 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सानियाने शोएब मलिकसोबत खुला तलाक केला. घटस्फोटानंतर शोएबने जरी दुबई सोडली असली तरीही सानियाने अजून सोडली नाही. फराह खानसोबत तिच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सानिया मिर्झाने सांगितले की, घटस्फोटानंतर तिची अवस्था नेमकी कशी होती.
आता सानियाने अजून एक मोठा खुलासा केला. सानिया मिर्झा हिने सांगितले की, डिलीव्हरीनंतर पहिल्यांदात मुलाला घरी सोडून कार्यक्रमात सहभागी होणे तिच्यासाठी किती जास्त कठीण होते. सानियाने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले की, ज्यावेळी मी घरातून त्याला सोडून निघाले त्यावेळी माझ्या मनात असंख्य गोष्टी सुरू होत्या आणि मलाच कळत नव्हते की, काय सुरू आहे. मी पूर्ण फ्लाईटमध्ये फक्त रडत होते.
ज्यावेळी मी माझ्या मुलाला सोडून घरातून बाहेर पडले होते, त्यावेळी माझा मुलगा फक्त सहा आठवड्यांचा होता. मला खरोखरच एका गोष्टीचा अभिमान वाटतो की, त्यावेळी मी हिंमत दाखवली. सानियाने आता सिंगल पालक असताना मुलाला एकट्याला सोडून भारतात येताना किती वाईट वाटते हे देखील सांगितले. बाकी गोष्टींचे काहीच वाटत नाही पण ज्यावेळी मी कामानिमित्त मुलाला दुबईला सोडून येते त्यावेळी सर्वात जास्त वाईट वाटत असलयाचे सानियाने म्हटले.