आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचा खर्च शहिदांच्या कुटुंबीयांना

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या क्रिकेट प्रशासक समितीने घेतलाय. या सोहळ्याचा वाचणारा सर्व पैसा पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना दिला जाणार असल्याची माहिती क्रिकेट प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिली. दरवर्षी आयपीएलच्या सुरुवातीला ग्रँड ओपनिंग सेरेमनीचं आयोजन केलं जातं, ज्यात मोठमोठे अभिनेते आणि कलाकार परफॉर्मन्स करतात. इंडियन …

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचा खर्च शहिदांच्या कुटुंबीयांना

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या क्रिकेट प्रशासक समितीने घेतलाय. या सोहळ्याचा वाचणारा सर्व पैसा पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना दिला जाणार असल्याची माहिती क्रिकेट प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिली. दरवर्षी आयपीएलच्या सुरुवातीला ग्रँड ओपनिंग सेरेमनीचं आयोजन केलं जातं, ज्यात मोठमोठे अभिनेते आणि कलाकार परफॉर्मन्स करतात.

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2019 चं पहिल्या दोन आठवड्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पहिला सामना 23 मार्चला गतविजेती धोनीची चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. चेन्नईतील एम चिदंबरम मैदानावर आयपीएलच्या नव्या मोसमाचं रणशिंग फुंकलं जाईल. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकात बदलही केला जाऊ शकतो. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्याचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल. शिवाय त्यानंतरच शेड्यूलही त्यावेळीच ठरवलं जाईल.

पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक

मार्च 23: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (चेन्नई)

मार्च 24: कोलकाता नाईट राइडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (कोलकाता)

मार्च 24: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स  (मुंबई)

मार्च 25: राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब, (जयपूर)

मार्च 26: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, (दिल्ली)

मार्च 27: कोलकाता नाईट राइडर्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब, (कोलकाता)

मार्च 28: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स, (बंगळुरु)

मार्च 29: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, (हैद्राबाद)

मार्च 30: किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, (मोहाली)

मार्च 30: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स, (दिल्ली)

मार्च 31: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स (हैद्राबाद)

मार्च 31: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, (चेन्नई)

एप्रिल 1: किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (मोहाली)

एप्रिल 2: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, (जयपूर)

एप्रिल 3: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, (मुंबई)

एप्रिल 4: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद, (दिल्ली)

एप्रिल 5: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स, (बंगळुरु)

व्हिडीओ पाहा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *