Asia Cup 2022 : पराभवाची जबाबदारी घ्यायला पाकिस्तानचा हा खेळाडू तयार

श्रीलंका सुरुवातीला ज्यावेळी फलंदाजी करीत होती, त्यावेळी पाकिस्तान एकहाती सामना जिंकेल अशी स्थिती होती.

Asia Cup 2022 : पराभवाची जबाबदारी घ्यायला पाकिस्तानचा हा खेळाडू तयार
pakistan team
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 12, 2022 | 2:45 PM

काल आशिया चषकात (Asia Cup 2022) पाकिस्तान (Pakistan) टीमचा पराभव झाल्यानंतर खेळाडूंवरती टीका होत आहे. कालच्या सामन्यात गचाळ फिल्डींग पाकिस्तानच्या खेळाडूंना नडली आहे. कारण अनेक झेल त्यांनी सोडले आहेत. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने अनेक धावा त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) खेळाडूंवरती टीका केली जात आहे.


कालचा पाकिस्तानचा चांगला खेळाडू शादाब खान यांच्याकडून दोन महत्त्वाचे झेल सुटले. त्यामुळे पाकिस्तान संघाला पराभावाला सामोरे जावे लागेल. कारण त्यावेळी समजा विकेट पडली असती, तर श्रीलंका टीमचा अधिक स्कोर झाला नसता. त्यामुळे शादाब खान ही पराभवाची जबाबदारी घ्यायला तयार आहे.

अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रोल केले जात आहे. त्यामुळे काल रात्री उशिरा शादाब खान याने चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच श्रीलंका टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

माफ करा, मी पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतो, मी माझ्या संघाला निराश केले. निसम शाह, हरिस रौफ, मोहम्मद नवाज आणि मोहम्मद रिझवान यांनी चमकदार कामगिरी केली. संपूर्ण टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले. श्रीलंकेचे अभिनंदन असा आशय शादाब खान याने ट्विटवरती लिहिला आहे.

श्रीलंका सुरुवातीला ज्यावेळी फलंदाजी करीत होती, त्यावेळी पाकिस्तान एकहाती सामना जिंकेल अशी स्थिती होती. परंतु पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे त्याचा पराभव झाला.