AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी बायकोला मारून आलोय!; नवऱ्याच्या कबुलीजबाबाने मोठी खळबळ, कल्याण हादरलं

कल्याणमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात बायकोचा खून करुन आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्याने पोलिसांसमोर 'मी बायकोला मारून आलोय!' असे म्हटले आहे.

मी बायकोला मारून आलोय!; नवऱ्याच्या कबुलीजबाबाने मोठी खळबळ, कल्याण हादरलं
खडकपाडाImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 14, 2026 | 3:45 PM
Share

कल्याणमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा खून करून थेट नाशिकच्या पोलीस ठाण्यात जाऊन “मी बायकोला मारून आलोय” अशी कबुली देणाऱ्या पतीमुळे पोलिसही काही काळ चक्रावून गेले. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार अल्पवयीन मुलासमोरच घडल्याचेही उघड झाले आहे. खडकपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला अटक करत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती विशाल साहेबराव भुतकर (वय ३०) याने हा खून केल्याचा आरोप आहे.

कल्याणमधील उंबर्डे परिसरात पत्नीची हत्या करून नाशिकला जाऊन स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेल्या पतीच्या कबुलीजबाबामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती विशाल साहेबराव भुतकर (वय ३०) याने हा खून केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य गेल्या दीड वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे वेगवेगळे राहत होते. विशाल हा मोठ्या मुलासह नाशिकमध्ये राहत होता, तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावातील केडीएमसी गार्डनजवळील कैलास कारभारी यांच्या चाळीत राहून घरकाम करून आपल्या पाच वर्षांच्या मुलीचे संगोपन करत होती.

नेमकं काय झालं?

दरम्यान, ११ मार्च रोजी विशाल नाशिकहून कल्याणमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आला होता. पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्यासाठी त्याने अर्चनाला विनंती केली. मात्र, अर्चनाने त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या विशालने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. हत्या केल्यानंतर विशाल नाशिकला पळून गेला आणि तेथील पोलीस ठाण्यात जाऊन “मी माझ्या बायकोला मारून आलो आहे” अशी कबुली दिली. यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

पोलिसात तक्रार दाखल

खडकपाडा पोलिसांचे पथक उंबर्डे परिसरातील घटनास्थळी पोहोचले असता अर्चना भुतकर हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मयताच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली. या प्रकरणी मयताचा मामेभाऊ राजू सुभाष ढाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार तपास पथक नाशिकला रवाना करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकर याला अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नऊ वर्षांचा मुलगा हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तपासात समोर आले आहे.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच