AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZvsSL | अरं बाप..! श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड कसोटी सामन्याचा थरार, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना Watch Video

न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका यांच्यात रंगलेला कसोटी सामना सर्वांच्याच लक्षात राहील. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलँडने बाजी मारली.

NZvsSL | अरं बाप..! श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड कसोटी सामन्याचा थरार, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना Watch Video
टेस्ट क्रिकेटमध्ये टी 20 स्टाईल हायव्होल्टेज ड्रामा, शेवटच्या रनपर्यंत न्यूझीलंड-श्रीलंकेत कडवी झुंज, अखेर किंवींनी बाजी मारलीचImage Credit source: Video Screenshot
| Updated on: Mar 13, 2023 | 1:43 PM
Share

मुंबई : न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका यांच्यात रंगलेल्या कसोटी सामन्याने क्रीडाप्रेमींची मनं जिंकली. कसोटी होता की टी 20 सामना अशीच चर्चा रंगली आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना पाहताना क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. श्रीलंकेनं किवींना त्यांच्याच धरतीवर जिंकण्यासाठी चांगलंच झुंजवलं. श्रीलंकेनं न्यूझीलँडला विजयासाठी 286 धावांच आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना न्यूझीलँडची शेवटच्या चेंडूपर्यंत दमछाक झाली. शेवटच्या चेंडूवर लेग बाय धावत एक धाव पूर्ण केली आणि 2 गडी राखून विजय मिळवला.

शेवटच्या षटकात असा रंगला थरार

पाचव्या दिवसाचं शेवटचं षटक श्रीलंकेच्या कर्णधारांनं असिथा फर्नांडोला सोपवलं. 6 चेंडूत 8 धावा न्यूझीलँडला हव्या होत्या. 278 धावांवर 7 गडी बाद अशी स्थिती होती. केन विलियमसन शतकी खेळी करत एकाकी झुंज देत होता.

  • षटकातील पहिला चेंडू : असिथा फर्नांडोनं विलियमसनला चेंडू टाकला आणि त्याने एक धाव घेतली
  • षटकातील दुसरा चेंडू: असिथानं हेन्रीला चेंडू टाकला आणि त्याने एक धाव घेतली आणि विलियमसन स्ट्राईकला आला.
  • षटकातील तिसरा चेंडू : असिथाने विलियमसनलाा चेंडू टाकला आणि त्यांनी वेगाने एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला. मात्र हेन्री यात बाद झाला. मात्र विलियमसनला स्ट्राईक मिळाली.
  • षटकातील चौथा चेंडू : असिथाने विलियमनल्या टाकलेल्या चेंडूवर चौकार ठोकला
  • षटकातील पाचवा चेंडू : असिथाने टाकलेला चेंडू निर्धाव गेला
  • षटकातील सहावा चेंडू : जिंकण्यासाठी अवघ्या एका धावेची आवश्यकता आणि शेवटचा चेंडू. त्यामुळे काहीही करून धाव घ्यायची होती. विलियमसननं शॉट हुकला आणि नॉन स्ट्राईकरनं धाव घेतली. कसाबसा तो तिथे पोहोचला. दुसरीकडे विलियमसनही अवघ्या काही इंचाने क्रिसमध्ये पोहोचल्याने धाव मिळाली.

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड कसोटी सामना

न्यूझीलँडनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिले दोन दिवस गाजवले. पहिल्या डावात श्रीलंकेने सर्वबाद 355 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलँडने सर्वबाद 373 धावा केल्या आणि 18 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात श्रीलंकेला 302 धावांवर रोखण्यात न्यूझीलँडला यश आलं. तसेच विजयासाठी 286 धावांचं आव्हान मिळालं. शेवटच्या दिवशी शेवटच्या न्यूझालँड 2 गडी राखून विजय मिळवला. केन विलियमसननं नाबाद 121 धावांची खेळी केली. असं असलं तरी शेवटच्या षटकापर्यंत श्रीलंकेनं न्यूझीलँडला विजयासाठी झुंजवलं तितकंच खरं आहे.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टिम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, नील वॅगनर आणि ब्लेअर टिकनर.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), ओशादा फर्नांडो, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), कसून रजिथा, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमा

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.