IND A vs PAK A : ‘शाहबाज अजून दोन ओव्हर..’ पाकिस्तानकडून हरण्याचं अंतर इतकं मोठं आहे की तिलक वर्माचा न पटण्यासारखा दावा
IND A vs PAK A : इंडिया ए आणि पाकिस्तान ए या दोन टीम्स रविवारी एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 टुर्नामेंटमध्ये भिडल्या. दोहामध्ये ही मॅच झाली. पाकिस्तान अ संघाने भारतीय अ संघावर मात केली. हा पराभव जिव्हारी लागणारा आहे.

एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 टुर्नामेंटमध्ये काल भारतीय अ संघाचा पराभव झाला. पाकिस्तानी अ संघाने 48 धावांनी भारतीय संघाला हरवलं. या पराभवानंतर इंडिया ए चा कॅप्टन तिलक वर्माने संघाच्या फलंदाजीवर निराशा व्यक्त केली आहे. मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेली निराशा आणि महत्वाच्या भागीदाऱ्या न बनल्याने टीमला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचता आलं नाही. तिलक वर्माने स्वत: शतक झळकावलं. पण त्याच्यासाठी व्यक्तिगत प्रदर्शनापेक्षा टीमचा विजय जास्त महत्वाचा आहे. रविवारी दोहाच्या वेस्ट अँड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सामना झाला. नेहमीप्रमाणे भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल प्रचंड उत्सुक्ता होती. पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली. त्यांनी इंडिया ए समोर विजयासाठी 314 धावांचं लक्ष्य ठेवलं.
या धावसंख्येचा पाठलाग करताना एकवेळ इंडिया ए ची स्थिती खराब झालेली. टीमने 129 रन्सवर सहाविकेट गमावलेले. त्यानंतर तिलक वर्मा आणि शाहबाज अहमदने सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी करुन विजयाची आशा निर्माण केलेली. शाहबाजने 41 चेंडूत 56 धावा फटकावल्या. तिलकने 149 चेंडूत 100 धावांचं योगदान दिलं. दोघे क्रीजवर असेपर्यंत टीम इंडियाच्या विजयाची आशा होती. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आम्ही दोघे धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत असताना शाहबाज अहमदचा विकेट गेला असं तिलक वर्माने सांगितलं. शाहबाज अजून दोन ओव्हर मैदानावर राहिला असता तर मॅचचा निकाला वेगळा लागला असता असं तिलक वर्माचं मत आहे. पाकिस्तानच्या 314 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 265 धावात आटोपला. पाकिस्तानने भारताचा 48 धावांनी पराभव केला.
तिलक वर्माकडून दोघांचं कौतुक
तिलक वर्माने अभिषेक शर्मा आणि शाहबाज अहमद दोघांचं कौतुक केलं. “अभिषेकने ज्या पद्धतीने स्टार्ट दिली आणि मधल्या षटकांमध्ये शाहबाजने माझ्यासोबत जी भागीदारी केली, ती महत्वपूर्ण होती. आम्ही वेगाने धावा बनवण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळी शाहबाज आऊट झाला. तो अजून दोन ओव्हर थांबला असता तर मी मॅच संपवली असती” असं तिलक वर्मा म्हणाला. आम्ही सातत्याने विकेट गमावल्या नसत्या तर 47 किंवा 48 व्या ओव्हर मध्येच मॅच जिंकली असती असं तिलक वर्माने सांगितलं. अभिषेक शर्माने 42 चेंडूत 70 धावा फटकावल्या. भारताला वेगवान सुरुवात दिली. पण तो बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव आला.