
India U-19 Team Announced : भारतीय क्रिकेटमधील युवा स्फोटक फलंदाज म्हणजे वैभव सूर्यवंशी. लवकरच वैभव पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. आशिया कप रायजिंग स्टार स्पर्धेत वैभवने आपला जलवा दाखवला. त्यानंतर वैभव आता पुन्हा आशिया कपमध्ये खेळताना दिसेल. यावेळी आशिय कप अंडर 19 टीममध्ये तो भारताचं प्रतिनिधीत्व करणारं आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या टुर्नामेंटसाटी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यात वैभवला सुद्धा स्थान मिळालय. पण कॅप्टनशिपची जबाबदारी अंडर 19 टीममधील त्याचा सिनिअर आयुष म्हात्रेला दिली आहे.
BCCI ने आज शुक्रवारी 28 नोव्हेंबरला आशिया कप अंडर 19 2025 टुर्नामेंटसाठी भारतीय टीमची घोषणा केली. दुबईमध्ये 12 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान वनडे फॉर्मेट मध्ये ही टुर्नामेंट होईल. त्यासाठी 15 सदस्यीय भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. यात सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी आहे. चौघांची स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढच्यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अंडर 19 चा वर्ल्ड कप होणार आहे. त्या दृष्टीने ही स्पर्धा खूप महत्वाची आहे.
कॅप्टन कोण?
या स्क्वॉडच सर्वात मोठं आकर्षण 14 वर्षाचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी आहे. त्याने क्रिकेट विश्वावर आपली छाप उमटवली आहे. पण कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सिनिअर खेळाडूला दिली आहे. टीमच नेतृत्व 17 वर्षाचा आयुष म्हात्रे करणार आहे. याचवर्षी इंग्लंड दौऱ्यावर अंडर 19 टीमचा तो कॅप्टन होता. विहान मल्होत्रा उपकर्णधार आहे. वैभव पुन्हा एकदा ओपनिंगची जबाबदारी सांभाळणार आहे. टीमला वेगवान सुरुवात देण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
अंडर 19 टीम
आयुष म्हात्रे (कॅप्टन), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन ए पटेल, नमन पुष्पक, डी दीपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंह (फिटनेसवर अवलंबून), उद्धव मोहन आणि ऐरन जॉर्ज
स्टँडबाय- राहुल कुमार, हेमचुदेषन जे, बीके किशोर, आदित्य रावत
टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचं शेड्यूल
या टुर्नामेंटमध्ये एकूण आठ टीम सहभागी होतील. यात भारत, पाकिस्तान ग्रुप ए मध्ये आहे. त्याशिवाय या ग्रुपमध्ये दोन क्वालिफायर टीम असतील. ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश, अफगानिस्तान आणि एक क्वालिफायर टीम आहे.
टीम इंडियाचं शेड्यूल असं आहे
12 डिसेंबर – भारत vs क्वालिफायर 1
14 डिसेंबर – भारत vs पाकिस्तान
16 डिसेंबर – भारत vs क्वालिफायर 3
19 डिसेंबर – A1 vs B2, सेमीफाइनल-1
19 डिसेंबर – B1 vs A2, सेमीफाइनल-2
21 डिसेंबर – फायनल