SMAT 2025: या भारतीय फलंदाजाने अवघ्या 31 चेंडूत ठोकलं शतक, वैभव सूर्यवंशीने मारले इतके षटकार
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळत असून त्याकडे क्रीडा जगताच्या नजरा लागून आहेत. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आक्रमक खेळीचा नजरा पाहायला मिळाला. अवघ्या 31 चेंडूत शतकी खेळी पाहायला मिळाली.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: सय्यद मुश्ताक अली देशांतर्गत टी20 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा झंझावात पाहायला मिळाला. या स्पर्धेत गुजरात आणि सर्विसेज हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात गुजरातच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सर्विसेजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरातने 12.3 षटकात फक्त 2 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात उर्विल पटेलचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने या सामन्यात गोलंदाजांना सळो की पळो करू सोडलं. उर्विल पटेलने अवघ्या 31 चेंडूत शतक ठोकलं. तसेच नाबाद 119 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी त्याने 12 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 321.62 चा होता.
उर्विलने रचला विक्रम
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उर्विलच्या नावावर एक अनोखा विक्रम रचला गेला आहे. त्याने या स्पर्धेतील दुसरं वेगवान शतक ठोकलं आहे. यापूर्वी बरोबर एक वर्षापूर्वी त्याने असंच वेगवान शतक ठोकलं होतं. तेव्हा समोर त्रिपुराचा संघ होता. त्यावेळी त्याने 28 चेंडूत शतक ठोकलं होतं. तसेच अभिषेक शर्माच्या वेगवान शतकी खेळीशी बरोबरी केली होती. अभिषेक शर्माने डिसेंबर 2024 मध्ये मेघालयविरुद्ध 28 चेंडूत शतक ठोकलं होतं. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत असून त्याने 20218 मध्ये हिमाचलविरुद्ध 32 चेंडूत शतक ठोकलं होतं. दरम्यान, उर्विल आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई संघाचा भाग होता. वंश वेदीच्या जागी त्याची निवड झाली होती. त्याला सीएसकेने रिटेन केलं आहे.
🦁 Urvil Patel 💥 Unleashed Mayhem 🏏 119* (37) 🆚 Services 🏆 SMAT pic.twitter.com/Qj8aSuPhqO
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 26, 2025
वैभव सूर्यवंशी फेल
14 वर्षीय वैभव सूर्यवंशी आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. बिहारकडून खेळताना चंदीगडविरुद्धच्या सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याने पहिल्या दोन चेंडूवर दोन उत्तुंग षटकार मारले. पण चौथ्या चेंडूवर संदीप शर्माने त्याला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. बिहारने या सामन्यात 157 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य चंदीगडने 18.4 षटकात चार गडी गमवून पूर्ण केलं.
