SMAT 2025: सूर्यकुमार यादव आणि अजिंक्य रहाणेचा झंझावात, टी20 सामन्यात सहज मिळवला विजय
देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत मुंबईने रेल्वेला 7 विकेट राखून पराभूत केलं. या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादवचा झंझावात पाहायला मिळाला.

सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेत मुंबई आणि रेल्वे यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा मुंबईच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 158 धावा केल्या आणि विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान मुंबईने 7 गडी आणि 25 चेंडू राखून पूर्ण केलं. या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांचा झंझावात पाहायला मिळाला. अजिंक्य रहाणे आणि आयुष म्हात्रे ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने 35 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. यात 21 चेंडूत 41 धावा या एकट्या अजिंक्य रहाणेच्या होत्या. आयुष म्हात्रे 15 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि अजिंक्य रहाणेची जोडी जमली. या जोडीने 31 चेंडूत 50 धावांनी भागीदारी केली. अजिंक्य रहाणे 33 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार मारत 62 धावांवर बाद झाला. तर सूर्यकुमार यादवचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. 47 धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्दिक तामोरे आणि शिवम दुबने विजयी भागीदारी करत विजय मिळवून दिला.
रेल्वेची सुरुवात काही चांगली झाली नाही. शिवम चौधरी आणि सुरज अहुजा ही जोडी मैदानात आली होती. पण संघाच्या 3 धावा असताना पहिला धक्का बसला. शार्दुल ठाकुरने सुरज अहुजाला अवघ्या 1 धावेवर असताना तंबूत पाठवलं. त्यानंतर शिवम चौधरी 11 धावा करून तंबूत परतला. तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद सैफ आणि रवी सिंग यांनी 45 धावांची भागीदारी केली. रवि सिंग 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर आशुतोष शर्मा मधल्या फळीत वादळी खेळी केली. त्याने 30 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारत 61 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे मुंबईसमोर 158 धावांचं आव्हान ठेवता आलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर (कर्णधार), अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, साईराज बी पाटील.
रेल्वे (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद सैफ, अक्षत पांडे, शुभम चौबे, आशुतोष शर्मा, रवी सिंग, सूरज आहुजा (विकेटकीपर), शिवम चौधरी, अटल बिहारी राय, कर्ण शर्मा (कर्णधार), राहुल शर्मा, राज चौधरी.
