Vaibhav Sooryavanshi: कोपऱ्यात बसून एकटाच ढसाढसा रडला, कोणी पाहिलंही नाही, टीम इंडियाने वैभवला एकटं पाडलं? Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका पार पडली जी भारतीय संघाने गमावली. आता मालिका गमावल्यानंतर वैभव सूर्यवंशीला सर्वात जास्त वाईट वाटलेले पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi: कोपऱ्यात बसून एकटाच ढसाढसा रडला, कोणी पाहिलंही नाही, टीम इंडियाने वैभवला एकटं पाडलं? Video Viral
vaibhav sooryavanshi crying video
| Updated on: Jul 12, 2026 | 10:15 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सर्व सामने भारतीय संघाने गमावले. एकही टी-20 सामना भारतीय संघाला जिंकता आलेला नाही ही सर्वात मोठी खेद आहे. भारतीय संघावर मोठी नामुष्की ओढवली, शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने मोठा बदल केला. वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवलं आणि संजू सॅमसनला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले. पण त्याचाही काही विशेष परिणाम झाला नाही. संघाने मालिका गमावलीच. मालिका गमावल्यानंतर सगळ्यांना जितके दु:ख झाले नाही तितके दु:ख वैभव सूर्यवंशीला झाले. व्हायरल व्हिडिओमधून तो किती दु:खी आहे ते समजेल.

संघातून वगळल्यानंतर वैभव सूर्यवंशी स्वतः निराश झालेला दिसला. सामन्यादरम्यान वैभव डगआऊटमध्ये उतरलेल्या चेहऱ्याने बसलेला दिसला, पण पाचव्या टी-20 सामन्यात भारतीय संघाच्या पराभवानंतर तो रडू लागला. सामन्यानंतर सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते, पण वैभव धक्क्यात होता आणि स्वतःला सावरू शकला नाही. वैभवचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वैभवचा स्वत:च्या इमोशनवर ताबा नाही. त्याला पटकन  रडू कोसळते. आयपीएलमध्ये राजस्थानचा संघ जेव्हा जेव्हा पराभूत झाला वैभवला रडू कोसळायचे. त्यामुळे वैभव खूप हळवा असल्याचे समजते.


इंग्लंड दौऱ्यावरील टी-20 मालिकेत टीम इंडियाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. भारतीय संघ मालिका 4-0 ने हरला. पावसामुळे एक सामना रद्द करण्यात आला. अंतिम टी20 सामन्यात इंग्लंडकडून जोस बटलर आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बटलरने 64 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 8 षटकारांसह 131 धावांची स्फोटक खेळी केली.

बटलरसोबतच ब्रूकनेही भारतीय गोलंदाजांना झोडपले. हॅरी ब्रूक 45 चेंडूंमध्ये 95 धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 8 षटकार आणि 4 चौकार मारले, ज्यामुळे यजमान संघाला 20 षटकांत 3 गडी गमावून 257 धावांचा डोंगर उभा करता आला. प्रत्युत्तरात, भारतीय संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 201 धावाच करू शकला आणि 56 धावांनी सामना गमावला. भारतीय संघाकडून इशान किशनने 56 धावा, तर तिलक वर्माने 53 धावा केल्या.

Follow Us