AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून भडकले भाजप नेते; थेट म्हणाले ‘लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर’

भाजप नेते नितेश राणे यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून तीव्र टीका केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी आमिरला लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं आहे. आमिरने काही दिवसांपूर्वीच गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं आहे.

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून भडकले भाजप नेते; थेट म्हणाले 'लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर'
नितेश राणे, आमिर खान-गौरी स्प्रॅटImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 12, 2026 | 9:53 AM
Share

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने 5 जुलै 2026 रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं आहे. आमिरच्या या तिसऱ्या लग्नावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी आमिर खानवर सडकून टीका केली आहे. नितेश राणेंनी आमिरला थेट ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचं म्हटलंय. आमिरने याआधी रीना दत्ताशी पहिलं आणि किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघींना घटस्फोट दिल्यानंतर त्याने गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नी आणि आता तिसरी पत्नीही हिंदू असल्याने त्यावरून जोरदार टीका होत आहे. बजरंग दलानेही शनिवारी आमिरविरोधात आंदोलन करत त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता.

माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “हिंदू समाजाने, विशेषकरून तरुणांनी हा विचार करण्याची खूप गरज आहे की ते कोणाला आपला आदर्श मानत आहेत. जेव्हा मोठे सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित निर्णय घेतात, तेव्हा त्याचा परिणाम समाजावरही होतो. जे हिंदू तरुण त्यांना सेलिब्रिटी मानतात, त्यांनी त्यांच्याकडून काय प्रेरणा घ्यावी याचा विचार केला पाहिजे. जेव्हा असे लोक त्यांच्या आयुष्याबद्दल निर्णय घेतात, तेव्हा हिंदू समाजानेही याचा विचार केला पाहिजे. लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहे? आमिर खान तो बनत नाहीये का? हिंदू तरुणांनी काळजीपूर्वक ठरवलं पाहिजे की त्यांनी कोणाचे चित्रपट पहावेत आणि त्यांना किती पाठिंबा द्यावा.”

मुंबईतील वांद्रे (पाली हिल) इथल्या राहत्या घरातच आमिर खानने गौरीशी तिसरं लग्न केलं. या लग्नाला फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते. मूळची बंगळुरूची असलेली गौरी स्प्रॅट सौंदर्य आणि वेलनेस उद्योगात कार्यरत आहे. ती ‘बी ब्लंट’ या सलून चेनची भागीदार आणि संचालकही होती. सध्या गौरी आमिर खान प्रॉडक्शन्समध्ये साहाय्य करते. गौरीचंही हे दुसरं लग्न असून तिच्या पूर्व पतीविषयी कोणतीही माहिती समाजमाध्यमांवर उपलब्ध नाही. पहिल्या पतीपासून तिला सहा वर्षांचा एक मुलगा आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला