AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू मुलींवरच प्रेम का? आमिरच्या तिसऱ्या लग्नाविरोधात बजरंग दलाचं आंदोलन, जाळला अभिनेत्याचा पुतळा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने नुकतंच तिसरं लग्न केलं. मात्र त्याच्या या लग्नाविरोधात आता बजरंग दलाने आंदोलन केलं आहे. आमिर लव्ह जिहाद करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

हिंदू मुलींवरच प्रेम का? आमिरच्या तिसऱ्या लग्नाविरोधात बजरंग दलाचं आंदोलन, जाळला अभिनेत्याचा पुतळा
Aamir Khan and Gauri Spratt Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 11, 2026 | 3:55 PM
Share

बिहारच्या फोर्ब्सगंज परिसरात बजरंग दलाच्या सदस्यांनी अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाविरोधात आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी आमिर खानचा पुतळा जाळला आणि त्याच्यावर ‘लव्ह जिहाद’ केल्याचा आरोप केला. आंदोलनादरम्यान ‘आमिर खान मुर्दाबाद’ आणि ‘आमिर खान जिहादी, भारत सोडून जा’, अशा घोषणाही देण्यात आल्या. बजरंग दलाचे नेते मनोज सोनी यांनी आमिरवर हिंदू समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. आमिर खान हा हिंदू भगिनी आणि मुलींसोबत लग्न करून हिंदूंना कमकुवत करण्याच्या मोठ्या कटाचा भाग म्हणून काम करत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. आमिरने अशा कृती थांबवल्या नाही तर त्याला धडा शिकवला जाईल, अशी धमकीही सोनी यांनी दिली आहे.

‘ऑलवेज बॉलिवूड’ने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सोनी म्हणाले, “तो एका हिंदू मुलीशी लग्न करतो आणि तैमूर, अफरोज, सलमानला जन्म देतो. हा कुठला नियम आहे? तो मुस्लिम महिलांच्या प्रेमात का पडू शकत नाही? तो हिंदू मुलींच्याच प्रेमात का पडतो? तो हिंदू समाजाला आव्हान देतोय. बघा मी नेहमीच हिंदू मुलींशी लग्न करत आलोय, असं जणू तो म्हणून दाखवतोय. आमिर खान हा हिंदूंना कमकुवत करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग म्हणून काम करतोय. तो सातत्याने हिंदू समाजाची बदनामी करतोय. या देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतोय.”

पहा व्हिडीओ-

आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्तासोबत पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या 16 वर्षांनंतर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर 2005 मध्ये त्याने किरण रावशी दुसरं लग्न केलं. किरण आणि आमिर 2021 मध्ये विभक्त झाले. आता 5 जुलै 2026 रोजी त्याने गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. गौरीची आई तमिळ आणि तिचे वडील आयरिश आहेत. तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गौरीची व्यावसायिक पार्श्वभूमी हेअरड्रेसिंगची असून तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्समधून फॅशन, स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये पदवी मिळवली आहे. ती एका सहा वर्षांच्या मुलाची आईसुद्धा आहे. गौरीच्या पूर्व पतीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सध्या ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा