Vaibhav Suryavanshi Century : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियन भूमीत मोठा कारनामा, सेंच्युरीसह SIX पे SIX, मॅक्कलसारखा बनवला रेकॉर्ड

Vaibhav Suryavanshi Century : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला तोड नाही. भारताच्या या उदयोन्मुख खेळाडूने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. त्याला आऊट करण्यासाठी बनवलेली रणनिती धुळीस मिळवली. वैभवने आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झोडून काढलय.

Vaibhav Suryavanshi Century : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियन भूमीत मोठा कारनामा, सेंच्युरीसह SIX पे SIX, मॅक्कलसारखा बनवला रेकॉर्ड
Vaibhav Suryavanshi
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 01, 2025 | 9:53 AM

Vaibhav Suryavanshi First Century in Australia : आता ऑस्ट्रेलियातही वैभव सूर्यवंशीची चर्चा सुरु झाली आहे. जे त्याला व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये करता आलं नाही, म्हणजे मर्यादीत षटकांच्या सामन्यात ते त्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये करुन दाखवलय. 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलिया भूमीवर शतक ठोकलं आहे. त्याचं ऑस्ट्रेलियातील हे पहिलं शतक आहे. त्याने ही कमाल अंडर 19 टेस्ट मॅचमध्ये केली आहे. वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीम विरुद्ध फक्त 78 चेंडूत शतक ठोकण्याचा कारनामा केला. वैभवने इतके सिक्स मारले की, त्याला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीम बनवलेली रणनिती धुळीस मिळाली.

वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यात चार सिक्स आहेत. त्याने 78 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यात सात सिक्स आहेत. त्याची एकूण इनिंग 86 चेंडूंची होती. यात 8 सिक्स आणि 9 फोरसह त्याने 113 धावा केल्या. 131.39 च्या स्ट्राइक रेटने झळकवलेलं शतक ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीम विरुद्ध कुठल्याही फॉर्मेटमध्ये झळकवलेलं त्याचं हे दुसरं शतक आहे. ऑस्ट्रेलियात त्याच्या बॅटमधून निघालेलं हे पहिलं शतक आहे.

ब्रेंडन मॅक्कलमनंतर असा कारनामा करणारा दुसरा खेळाडू

वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीम विरुद्ध 78 चेंडूत शतक झळकावलं. यूथ टेस्ट इतिहासातील हे चौथ वेगवान शतक आहे. यासोबतच त्याने ब्रेंडन मॅक्कलमच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्कलम नंतर वैभव दुसरा खेळाडू बनलाय ज्याने अंडर 19 टेस्टमध्ये 100 पेक्षा कमी चेंडूत दोन शतकं झळकावली आहेत.

वैभव सूर्यवंशीने फॅन्सना निराश केलं नाही

वैभव सूर्यवंशीचा हा ऑस्ट्रेलियाचा पहिला आणि दुसरा परदेश दौरा आहे. याआधी त्याने इंग्लंड दौरा केला होता. पण तिथे त्याला खास प्रदर्शन करता आलं नव्हतं. पण ऑस्ट्रेलियात वैभव सूर्यवंशीने फॅन्सना निराश केलं नाही. त्याने तेच केलं, ज्यासाठी वैभव ऑस्ट्रेलियात गेलाय. वैभव सूर्यवंशीच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीम विरुद्ध पहिल्या यूथ टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत आहे. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये वैभव सूर्यवंशीच्या खणखणीत शतकी खेळीनंतर तो सर्वत्र चर्चेत आहे.