Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने इंग्लिश गोलंदाजांना असं झोडलं की चेंडू फक्त स्टेडियम बाहेरच नाही मारला, तर हरवून टाकला

Vaibhav Suryavanshi : आयपीएल नंतर आता वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौरा गाजवतोय. वैभवने अंडर 19 इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केलं. आपल्या फलंदाजीने त्याने इंग्लिशन गोलंदाजाची दिशा, टप्पा बिघडवून टाकला. इंग्लिश गोलंदाजांवर तो तुटून पडला. त्याने इंग्लिश बॉलरना असं झोडलं की, चेंडूच हरवला.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने इंग्लिश गोलंदाजांना असं झोडलं की चेंडू फक्त स्टेडियम बाहेरच नाही मारला, तर हरवून टाकला
vaibhav suryavanshi
Image Credit source: ससेक्स यूट्यूब वीडियो Screengrab
| Updated on: Jun 28, 2025 | 10:14 AM

वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये तुफानी फलंदाजी केली. त्यानंतर आता इंग्लंडमध्ये आपली कमाल दाखवली आहे. 14 वर्षाच्या वैभवने इंग्लंडच्या अंडर 19 टीम विरुद्ध आक्रमक बॅटिंग करुन आपला जलवा दाखवला. होव येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात वैभवने फक्त 19 चेंडूत 48 धावा ठोकल्या. या इनिंगमध्ये वैभव सूर्यवंशीने पाच सिक्स आणि तीन फोर मारले. म्हणजे त्याने 42 धावा फक्त चौकार-षटकराने कुटल्या. सूर्यवंशीने भले अर्धशतक झळकवल नसेल, पण आपल्या तुफानी बॅटिंगने त्याने चेंडू हरवून टाकला.

वैभव सूर्यवंशी फलंदाजीसाठी उतरला, त्यावेळी त्याने दुसऱ्याच चेंडूवर कव्हर ड्राइव्ह मारुन खातं उघडलं. वैभवने आपल्या इनिंगच्या 10 व्या चेंडूवर जे केलं, ते खरच आश्चर्यकारक होतं. त्याने इंग्लिश गोलंदाज फ्रेंचने शॉर्ट ऑफ लेंग्थ चेंडू टाकला. त्यावर वैभवने कमालीचा स्ट्रोक मारला. चेंडू स्केवअर लेंग बाऊंड्री नाही, तर थेट स्टेडियमबाहेर गेला. चेंडू स्टेडियमच्या बाहेर असलेल्या घरात गेला. त्यानंतर नवा चेंडू मागवावा लागला.

इंग्लिश गोलंदाजांची लाइन लेंग्थ बिघडवली

सहाव्या ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशी आणखी आक्रमक झाला. या डावखुऱ्या फलंदाजाने वेगवान गोलंदाज होमच्या एकाच ओव्हरमध्ये तीन सिक्स मारले. पहिल्या चेंडूवर सूर्यवंशीने सिक्स मारला. ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर दोन सिक्स मारले. सूर्यवंशीचा तिसरा सिक्स स्टेडियमच्या बाहेर असलेल्या घरात गेला. वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफानी बॅटिंगने इंग्लिश गोलंदाजांची लाइन लेंग्थ बिघडवून टाकली.

अंडर 19 टीमची विजयी सुरुवात

आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने काउंटी ग्राउंड, होवेमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंडर 19 इंग्लंडचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. यासह भारतीय क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंदु या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली.