MI vs DC : इतका मार पडला की बुमराहला सहनच झालं नाही, LIVE मॅचमध्ये नायरला भिडला, VIDEO
MI vs DC : दुखापतीमधून सावरल्यानंतर जसप्रीत बुमराहने IPL 2025 मध्ये पुनरागमन केलय. पण अजूनपर्यंत त्याला छाप उमटवणारी कामगिरी करता आलेली नाही. काल दिल्ली विरुद्धच्या सामन्यात बुमराहला भरपूर मार पडला. बुमराह एक वर्ल्ड क्लास बॉलर आहे. त्यामुळे त्याला राग येणं स्वाभाविक आहे.

आयपीएल 2025 चा 29 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये झाला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये ही मॅच झाली. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 205 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सगळी टीम 19 ओव्हर्समध्ये 193 रन्सवर ऑलआऊट झाली. या सीजनमधील DC चा पहिला पराभव आहे. या सामन्यात खेळाडूंमध्ये काही चकमकी पहायला मिळाल्या. MI चा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने DC चा फलंदाज करुण नायरसोबत भर मैदानात वाद घातला. अखेर मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याला मध्यस्थी करावी लागली.
जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर मैदानावर पुनरागमन करतोय. अजून तो विशेष प्रदर्शन करु शकलेला नाही. दिल्लीच्या फलंदाजांनी बुमराहच्या गोलंदाजीवर भरपूर धावा लुटल्या. करुण नायर दीर्घ कालावधीनंतर आयपीएल खेळतोय. त्यानंतर आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन केलंय. त्याने जसप्रीत बुमराहची गोलंदाची चोपून काढली.
रोहित शर्माची Reaction पाहण्यासारखी
मुंबई इंडियन्स विरुद्ध धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या करुण नायरने शानदार फलंदाजी केली. त्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार-षटकार लगावले. त्यामुळे नाराज झालेल्या बुमराहने मैदानात नायरशी वाद घातला. त्यानंतर करुण नायरने मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याकडे बुमराहची तक्रार केली. पंड्याने नायरची समजूत काढून प्रकरण शांत केलं. त्यावेळी मैदानावर फिल्डिंग करणारा रोहित शर्मा मंद स्मित करताना दिसला.
View this post on Instagram
नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली
दुखापतीतून सावरल्यानंतर 7 एप्रिलला बुमराह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मैदानात उतरला. पण तो काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्याने 4 ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या. पण यश मिळालं नाही. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध बुमराहने 4 ओव्हरमध्ये 44 धावा दिल्या. पण यश मिळालं नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या करुण नायरने जसप्रती बुमराहची गोलंदाजी फोडून काढली. करुण नायरने 40 चेंडूत 5 सिक्स, 12 चौकारांच्या मदतीने 89 धावा केल्या. जसप्रीत बुमराह वर्ल्ड क्लास बॉलर आहे. मोक्याच्या क्षणी विकेट काढण्याची त्याची खासियत आहे. पण सध्या बुमराह फॉर्ममध्ये दिसत नाहीय. त्याची नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली. परिणामी तो मैदानात करुण नायरला भिडला.
