AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Hazare Trophy | चौकार षटाकारांचा पाऊस, मध्य प्रदेशच्या व्यंकटेश अय्यरची 198 धावांची स्फोटक खेळी

व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) पंजाब (Punjab) विरुद्ध ही खेळी केली आहे.

Vijay Hazare Trophy | चौकार षटाकारांचा पाऊस, मध्य प्रदेशच्या व्यंकटेश अय्यरची 198 धावांची स्फोटक खेळी
व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) पंजाब (Punjab) विरुद्ध ही खेळी केली आहे.
| Updated on: Feb 28, 2021 | 8:27 PM
Share

इंदूर : विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare trophy) सध्या अनेक खेळाडू तडाखेदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत दररोज अनेक फलंदाज हे वादळी खेळी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईकर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) तडाखेदार द्विशतक झळकावलं होतं. पृथ्वी शॉ सारखीच आणखी खेळी एका युवा फलंदाजाने केली. ही कामगिरी इंदूरमधील होलकर स्टेडियममध्ये (Holkar Stadium) केली. व्यंकटेश अय्यरने ( Venkatesh Iyer) ही खेळी साकारली. मध्य प्रदेशच्या अय्यरने पंजाबविरुद्ध 198 धावांची खेळी केली. व्यंकटेशच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. पण दुर्देवाने त्याचे द्विशतक 2 धावांनी हुकले. (Vijay Hazare Trophy 2020 21 Venkatesh Iyer miss double century 2 runs against Punjab)

दुर्देवाने द्विशतक हुकलं

मध्य प्रदेशने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अय्यरने आपला सलामीचा साथीदार अभिषेक भंडारी याच्यासह डावाची सुरूवात केली. सुरुवातीपासूनच वेगाने धावा केल्या. या सलामी जोडीने 68 धावांची भागीदारी केली. अभिषेकने 21 धावांची खेळी केली. त्यानंतर रजत पाटीदारच्या जोडीने संघाची धावसंख्या 204 वर नेली. 204 धावा असताना रजत बाद झाला. त्याने 59 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या.

पण अय्यर थांबण्याच नाव घेत नव्हता. दुसऱ्या बाजूने अय्यरची जोरदार फटकेबाजी सुरु होती. तो गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता. अय्यर दुहेरी शतकाच्या उंबरठ्यावर होता. त्याला अवघ्या 200 धावांसाठी 2 धावांची गरज होती. पण सिद्धार्थ कौलच्या चूकीमुळे अय्यर कर्नाटकाच्या 352 धावा असताना रन आऊट झाला. अय्यरने 146 चेंडूंचा सामना करत 20 चौकार आणि 7 षटकारांसह 198 धावा चोपल्या.

400 पार मजल

अय्यर बाद झाल्यानंतर आदित्य श्रीवास्तवने मध्य प्रदेशची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. श्रीवास्तवच्या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने निर्धारित 50 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 402 धावांपर्यंत मजल मारली. आदित्यने नाबाद 88 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर कर्णधार पार्थ सहानी 28 धावांवर नाबाद राहिला.

IPL 2021 मध्ये अय्यर केकेआरकडून खेळणार

अय्यर आयपीएल्या आगामी मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे. कोलकाताने अय्यरला 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. या तडाखेदार खेळीमुळे आयपीएलमध्येही अय्यरकडून कोलकाताला अशाच प्रकारच्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, DCvs RCB : देवदत्त पडीक्कलची विक्रमी कामगिरी

South Africa Tour India | टीम इंडिया विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची घोषणा

Vijay Hazare Trophy | श्रीसंतची आक्रमक गोलंदाजी, रॉबिन उथप्पाची वादळी खेळी, केरळाचा बिहारवर 9 विकेट्सने शानदार विजय

(Vijay Hazare Trophy 2020 21 Venkatesh Iyer miss double century 2 runs against Punjab)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.