बाद नसतानाही विराटला माघारी पाठवलं, पंचांवर चाहत्यांचा संताप

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ज्या पद्धतीने बाद ठरवण्यात आलं, त्यावरुन नवा वाद निर्माण झालाय. विराटकडून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई सुरु होती. पण पंचांनी त्याला मध्येच झेलबाद दिलं. पीटर हँड्सकॉम्बने घेतलेला झेल जमिनीवर टेकल्याचं दिसत असतानाही विराटला बाद दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. स्लीपला उभ्या असलेल्या हँड्सकॉम्बने विराटचा झेल घेतला आणि […]

बाद नसतानाही विराटला माघारी पाठवलं, पंचांवर चाहत्यांचा संताप
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:50 PM

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ज्या पद्धतीने बाद ठरवण्यात आलं, त्यावरुन नवा वाद निर्माण झालाय. विराटकडून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई सुरु होती. पण पंचांनी त्याला मध्येच झेलबाद दिलं. पीटर हँड्सकॉम्बने घेतलेला झेल जमिनीवर टेकल्याचं दिसत असतानाही विराटला बाद दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

स्लीपला उभ्या असलेल्या हँड्सकॉम्बने विराटचा झेल घेतला आणि विकेट पडल्याचा जल्लोषही केला. विराट बाद झालाय का हे स्पष्ट नव्हतं. पंचांनी तिसऱ्या अम्पायरकडे निर्णय सोपवला. तरीही विराटला बाद देण्यात आलं. पण विराट बाद नसल्याचं सांगत अम्पायरवर तीव्र रोष व्यक्त केला जातोय.

लिटल मास्टर सुनील गावसकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनेही पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरुन तर पंचांचा समाचार घेतला जातोय.

विराट 123 धावांवर बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 251 होती. शिवाय भारत 75 धावांनी पिछाडीवर होता. रिषभ पंत आणि विराट खेळपट्टीवर असल्यामुळे एकूण धावसंख्या तीनशेच्या पार जाईल, असं सहज वाटत होतं. पण हा झेल जमिनीवर टेकलेला दिसत असतानाही बाद देण्यात आल्यामुळे भारताच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं.

चेंडू जमिनीवर असताना ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकाने खिलाडी वृत्ती दाखवत विराट बाद नसल्याचं स्वतःच सांगणं अपेक्षित होतं. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू हे सौजन्य कधीही दाखवत नाहीत हे इतिहासच सांगतो. या झेलने 2008 च्या प्रसंगाचीही आठवण करुन दिली, जेव्हा मायकल क्लार्कने सौरव गांगुलीचा झेल घेतला होता.

https://twitter.com/AltRapier/status/1074171344777023488

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें