विराट कोहलीने सचिनचा आणखी एक विक्रम मोडला

पर्थ : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पर्थ कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने शतकी खेळी (123) करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडित काढला आहे. कोहलीच्या कारकीर्दीतील हे 25 वं शतक होतं. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वात जलदगतीने 25 वं कसोटी शकत झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. 127 इनिंगमध्येच कोहलीने 25 …

विराट कोहलीने सचिनचा आणखी एक विक्रम मोडला

पर्थ : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पर्थ कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने शतकी खेळी (123) करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडित काढला आहे. कोहलीच्या कारकीर्दीतील हे 25 वं शतक होतं. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वात जलदगतीने 25 वं कसोटी शकत झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. 127 इनिंगमध्येच कोहलीने 25 वं शतक पूर्ण केलं.

25 शतकांचा पल्ला गाठण्यासाठी सर डॉन ब्रॅडमन यांनी फक्त 68 इनिंग खेळल्या, विराटने 127, तर सचिनने 130 इनिंगमध्ये 25 शतकं पूर्ण केले होते. बॅडमन यांनी 70 वर्षांपूर्वी केवळ 68 डावांमध्ये 25 वे कसोटी शतक पूर्ण करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. तर विराटने 127 डावांमध्ये ही कामगिरी पार पाडली.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सहा कसोटी शतके झळकावून विराटने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सहा, तर लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी पाच शतके झळकावली आहेत. तर व्हीव्हीएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर चार कसोटी शतके झळकावली आहेत.

विराटच्या शतकांची मालिका ही विक्रमी आहे. या 25 शतकांपैकी ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे सातवं शतक होतं. सहावं ऑस्ट्रेलियातलं, भारताबाहेरचं चौदावं, 2018 या वर्षातलं पाचवं, कर्णधार म्हणून अठरावं, पहिल्या डावातलं विसावं, सामन्यातील दुसऱ्या डावातलं तेरावं, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतानाचं 21 वं असे विक्रम या शतकाच्या नावावर झाले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *