विराट कोहली निवृत्त, चाहते नाराज, पण BCCI ची भूमिका काय? समोर अधिकृत…

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या निवृत्तीची चर्चा चालू होती.

विराट कोहली निवृत्त, चाहते नाराज, पण BCCI ची भूमिका काय? समोर अधिकृत...
virat kohli retirement
| Updated on: May 12, 2025 | 6:05 PM

Virat Kohli Retirement : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या निवृत्तीची चर्चा चालू होती. विशेष म्हणजे त्याने कसोटी क्रिकेट प्रकारातून आताच निवृत्तीचा निर्णय घेऊ नये, असे मत व्यक्त केले जात होते. मात्र अखेर त्याने आपल्या मतावर ठाम राहात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, विराटच्या या निर्णयानंतर बीसीसीआयने भूमिका मांडली आहे.

बीसीसीआयने केले अनेक ट्विट्स

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयने आपल्या एक्स या सामजामाध्यमावर काही पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये बीसीसीआयने विराटच्या कसोटी क्रिकेटच्या करिअरविषयी माहिती दिली आहे. तसेच विराटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये काय कामगिरी केली आहे? याबाबतही सविस्तर सांगिलंय. बीसीसीआयने विराट कोहलीचे आभारदेखील मानले आहेत.

बीसीसीआयने नेमकं काय म्हटलंय?

” विराट कोहली तुझे आभार. कसोटी क्रिकेटचे एक पर्व संपले आहे. मात्र विराटचा वारसा हा पुढे कायम चालू राहील. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघासाठी त्याने दिलेल्या योगदान कायम स्मरणात ठेवले जाईल,” असे बीसीसीआयने म्हटले आहे.

बीसीसीआय कोणत्याही खेळाडूवर दबाव टाकत नाही

बीसीसीआयचे अपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीदेखील विराटच्या निवृत्तीवर भाष्य केलंय. “विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये दिलेले योगदान हे अमूल्य आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचा निर्णय घेतला असून आम्हाला वाईट वाटत आहे. विराट कोहलीने स्वत: तो निर्णय घेतला आहे. निवृत्तीसाठी बीसीसीआय कोणत्याही खेळाडूवर दबाव टाकत नाही. आपण विराटच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. विराटच्या क्रिकेटची आम्हाला कायम उणीव भासेल. तो खूप चांगला फलंदाज आहे,” असे राजीव शुक्ला यांनी सांगितले.

दरम्यान, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो भारतीय संघाकडून एकदियवस क्रिकेट सामन्यांत खेळणार आहे. तो आयपीएल सामन्यांतही खेळताना दिसेल. विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये सध्या नाराजी आहे.