IND vs SA : विराट, रोहित सगळे हसत होते, ऋषभ पंत मात्र… टीम इंडियाचं फोटोशूट पाहिलं का ?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंचे खास फोटोशूट झालं. सगळे खेळाडू तेव्हा एकदम मस्तीच्या मूडमध्ये होते. फक्त ऋषभ पंत हा...

IND vs SA : विराट, रोहित सगळे हसत होते, ऋषभ पंत मात्र... टीम इंडियाचं फोटोशूट पाहिलं का ?
टीम इंडिया फोटोशूट
Image Credit source: social media
| Updated on: Nov 29, 2025 | 11:52 AM

IND vs SA : भारत वि. दक्षिण आफ्रिका या दोन संघात उद्यापासून(30 नोव्हेंबर) रांचीमध्ये वनडे सीरिजला सुरूवात होत आहे. कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्लायावर ही वनडे मालिक जिंकण्यासाठी बारतय संघ जिद्दीने मैदानात उतरणार आहे. मात्र रविवारी दक्षिण आफ्रिकेशी भिडण्यापूर्वी टीम इंडियाचं एक फोटोशूट झालं, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, अर्शदीप सिंग आणि रोहित शर्मा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. विराट कोहलीनेही फोटोशूटमध्ये भाग घेतला होता. पण सर्वात मजेदार घटना ऋषभ पंतसोबत घडली, जो नीट हसूही शकत नव्हता. जेव्हा फोटोग्राफने पंतला नीट हसायाल सांगितलं तेव्हा ते त्यान अजब उत्तर दिलं. जे ऐकून सगळेच हसायला सांगितले.

झोपेतून उठून फोटोशूटसाठी आला ऋषभ पंत

टीम इंडियाच्या इतर खेळाडूंप्रमाणे, ऋषभपंत देखील फोटोशूटसाठी आला होता. फोटोग्राफरने त्याचे काही फोटो काढले, पण तो नीट हसत नव्हता, तेव्हा फोटोग्राफरने त्याला जरा आणखी, नीट हसण्यास सांगितलं. तेव्हा पंतने त्याला थेट उत्त दिलं की ,मी नुकताच झोपेतून जागा झालो आहे. पंतचे फोटो काढण्यात येत होते, तेव्हा त्याच्या डोळ्यांत अतिशय झोप दिसत होती. तर दुसरीकडे अर्शदीप सिंग एका वेगळ्याच ऊर्जेत दिसत होता. “जर फोटो बरोबर आला नसेल तर पुन्हा काढा.” असं तो त्याचा फोटो क्लिक झाल्यानंतर म्हणाला. दुसरीकडे, विराट कोहलीने हा अतिशय प्रोफेशनली फोटो काढून घेत होता तर रोहित शर्माने फोटोग्राफरलाच समजावलं की कोणता अँगल आधी घ्यायचा..

 

वनडे सीरिज जिंकणं गरजेचं

मजा-मस्ती खूप झाली, पण टीम इंडियासाठी ही वनडे सीरिज जिंकणं खूप गरजेचं आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका आधीच गमावली आहे. 0-2 असा क्लीन स्वीप केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मोठया प्रमाणात टीका सहन करावी लागली. एवढंच नव्हे तर त्याला पदावरून हटवण्याबद्दलही चर्चा झाली. त्यामुळे वनडे मध्येतरीटीम इंडियाचा परफॉर्मन्स उत्तम व्हावा अशी कोचसकड सर्वांची इच्छा असेल. या फॉरमॅटमधील शेवटची मालिका भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावली. जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही असेच घडले तर मुख्य प्रशिक्षकापासून ते संपूर्ण संघावर दबाव नक्कीच वाढेल.