
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा यजमान पाकिस्तान होता. पण टुर्नामेंटच्या फायनलवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच कुठे अस्तित्वच दिसलं नाही. टीम इंडिया जिंकल्यानंतर प्रेजेंटेशन सोहळा झाला. त्यावेळी PCB चा कोणी अधिकारी तिथे दिसला नाही. त्यामुळे आता यावरुन वाद निर्माण झालाय. शोएब अख्तरच्या वक्तव्याने या आगीत तेल ओतण्याच काम केलय. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्यावेळी पीसीबीकडून तिथे कोणी नव्हतं, हे समजण्यापलीकडे आहे असं शोएब अख्तर म्हणाला. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम जे बोलला, त्यावरुन तिथे पीसीबीकडून कोणीच का हजर नव्हतं? त्यामागच कारण समजलं. PCB चे चेअरमन प्रेजेंटेशन सेरेमनीच नाही, दुबईमध्ये सुद्धा दिसले नाहीत.
वसीम अक्रमने दिलेल्या माहितीनुसार, PCB चेअरमन मोहसिन नकवी फायनलसाठी दुबईत पोहोचू शकले नाही, यामागच कारण त्यांची प्रकृती आहे. अक्रमने स्पोर्ट्स सेंट्रल नावाच्या यू-ट्यूब चॅनलशी बोलताना ही माहिती दिली. माझ्या माहितीनुसार, PCB चेअरमनची तब्येत चांगली नाहीय. त्यामुळे ते फायनलासाठी दुबईला जाऊ शकले नाहीत. वसीम अक्रमने हे स्पष्ट केलं की, “PCB कडून त्यांचे दोन अधिकारी सुमेर अहमद आणि उस्मान वाला तिथे हजर होते. ते स्टेजवर का गेले नाहीत? हे माहित नाही असं त्याने सांगितलं”
ही विचार करण्यासारखी बाब
याआधी शोएब अख्तरने फायनल प्रेजेंटेशन सेरेमनीच्यावेळी PCB चेअरमन किंवा अन्य कोणी अधिकारी तिथे उपस्थित नव्हता, यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. हे समजण्यापलीकडे आहे असं तो म्हणाला. “वर्ल्ड स्टेजच्या सामन्यामध्ये असं होणं ही विचार करण्यासारखी बाब आहे. त्यांनी स्टेजवर असायला पाहिजे होतं” असं शोएब अख्तर म्हणाला.
This is literally beyond my understanding.
How can this be done???#championstrophy2025 pic.twitter.com/CPIUgevFj9— Shoaib Akhtar (@shoaib100mph) March 9, 2025
टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही कितवी वेळ?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला 4 विकेटने हरवलं. टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. याआधी 2002 आणि 2013 साली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियाने ICC चेअरमन जय शाह यांच्या हातून ही ट्रॉफी घेतली.