AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | IPL मध्ये 75 लाखांची बोली, वेस्ट इंडिजच्या ऑलराऊंडरचा धमाका, 6 चेंडूत सामना फिरवला

वेस्टइंडिजचा (West Indies) अष्टपैलू खेळाडू फॅबियन अ‍ॅलनने (Fabian Allen) श्रीलंके विरुद्धच्या (sri lanka) तिसऱ्या टी 20 सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. यासह विंडिजने ही मालिका 2-1 ने जिंकली.

Video | IPL मध्ये 75 लाखांची बोली, वेस्ट इंडिजच्या ऑलराऊंडरचा धमाका, 6 चेंडूत सामना फिरवला
वेस्टइंडिजचा (West Indies) अष्टपैलू खेळाडू फॅबियन अ‍ॅलनने (Fabian Allen) श्रीलंके विरुद्धच्या (sri lanka) तिसऱ्या टी 20 सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. यासह विंडिजने ही मालिका 2-1 ने जिंकली.
| Updated on: Mar 08, 2021 | 11:53 AM
Share

अँटिगा : वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (West Indies vs Sri Lanka) यांच्यातील तिसरा टी 20 सामना (3 rd T 20I) रविवारी 7 मार्चला पार पडला. विंडिजने हा तिसरा सामना 3 विकेट्सने जिंकला. या विजयासह यजमान विंडिजने 2-1 च्या फरकाने मालिका जिंकली. या टी 20 मालिकेचं आणि 6 चेंडूंचं एक वेगळं कनेक्शन आहे. यामुळे श्रीलंकेचा पराभव झाला. (west indies vs sri lanka 3rd t 20 all rounder Fabian Allen scored 21 runs in 6 ball at Antigua)

या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात फार चांगली राहिली नाही. पण मधल्या फळीतील दिनेश चांदिमालने 54 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावून 131 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे विडिंजला विजयासाठी 132 धावांचे आव्हान मिळाले. हे विजयी आव्हान विंडिजने 6 चेंडूआधी 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. म्हणजेच तिसरा सामना विंडिजने 3 विकेट्सने जिंकला.

श्रीलंकेवर फॅबियन अ‍ॅलन वरचढ

या सामन्यात विंडिजचा अष्टपैलू खेळाडू फॅबियन अ‍ॅलन श्रीलंकेवर वरचढ ठरला. त्याने या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने अष्टपैलू कामगिरी केली. फॅबियनने या सामन्यातील एकूण 4 ओव्हर गोलंदाजी केली. त्यात त्याने 13 धावा देत श्रीलंकेचा सलामीवीर धनुष्का गुनाथिलकला आऊट केलं. त्यानंतर बॅटिंग करताानही श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलाच चोपला. फॅबियनने अवघ्या 6 चेंडूत 21 धावा ठोकत श्रीलंकेचा गेम ओव्हर केला. फॅबियनच्या या खेळीत 3 सिक्स खेचले. म्हणजेच त्याने सिक्सच्या मदतीने 18 धावा केल्या. तर उर्वरित 3 धावा या धावून पूर्ण केल्या.

आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणार

फॅबियनला आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी पंजाब किंग्सने 75 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. फॅबने या तिसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत पंजाबचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे पंजाबला फॅबकडून आयपीएलच्या 14 व्या हंगामात अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान आयपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून होत आहे.

आयपीएलचं भारतात आयोजन

यंदाच्या आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन हे भारतात करण्यात आलं आहे. या मोसमात एकूण 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये 56 साखळी सामने, 3 बाद फेरीतील मॅच आणि अंतिम सामना अशा एकूण 60 मॅचेस असणार आहेत. आयपीएलचा थरार एकूण 6 शहरात आणि 51 दिवस रंगणार आहे. विशेष म्हणजे या वेळेस एकही संघ आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार नाही. यंदाच्या साखळी फेरीतील सामन्यांचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी करण्यात आले आहे. यामुळे आपल्या होम कंडीशनचा फायदा कोणत्याच संघाला होणार नाही. यामुळे अशा परिस्थितीत कोणता संघ बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

Video | कायरन पोलार्डचा तडाखा, 6 चेंडूत 6 सिक्स, युवराजच्या विक्रमाशी बरोबरी

(west indies vs sri lanka 3rd t 20 all rounder Fabian Allen scored 21 runs in 6 ball at Antigua)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...