
Smriti Mandhana and Palash Muchhal: आयसीसी वुमन्स वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतात उत्साहाचं वातावरण होतं. आता भारतात पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या स्मृती मानधना हिच्या घरी आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्मृती मानधना हिची चर्चा सुरु आहे. कारण स्मृती मानधना लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे… स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. स्मृती हिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. स्मृती मानधना बॉयफ्रेंड पलाश मुछाल याच्यासोबत लग्न करणार आहे. स्मृती हिने खास व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्मृती हिला शुभेच्छा दिल्या…
सध्या सर्वत्र स्मृती हिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे लोकांना जाणून घ्यायचं आहे की, स्मृतीचा होणारा नवरा कोण आहे? स्मृती मानधनाचा नवरा काय करतो? पलाश मुच्छल कोण आहे? पलाश मुच्छलचं वय किती आहे? पलाश मुच्छलची एकूण संपत्ती किती आहे? पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनामध्ये कोण मोठं आहे?
स्मृती मानधना 2019 पासून म्यूझिक कंपोजर आणि निर्माता पलाश मुच्छल याला डेट करत आहे. पलाश मुच्छल याने 2014 च्या ‘ढिश्कियाऊं’ या सिनेमातून पदार्पण केलं. पलाश याने ‘भूतनाथ रिटर्न्स’ या सिनेमासाठीही संगीत दिलं आहे. त्याचं प्रसिद्ध गाणं ‘पार्टी तो बनती है’ हे खूप लोकप्रिय आहे. शिवाय, ‘तू ही है आशिकी’ हे गाणे देखील चाहत्यांचं आवडतं आहे.
गाणी कंपोज करण्यासोबत पलाश याने अभिनय देखील केला आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘खेलें हम जीने से’ या सिनेमात त्याने झुंकू ही भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या वयाच्या फरकाबद्दल बोलायचे झाले तर, पलाशचा जन्म 22 मे 1995 मध्ये झाला. तर स्मृती मानधना हिचा जन्म 18 जुलै 1996 रोजी झाला. म्हणजे, स्मृती आणि पलाश यांच्या वयात फक्त एक वर्ष आणि तीन महिन्यांचा फरक आहे…
दोघांच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टमुसार स्मृती हिची एकूण संपत्ती 34 कोटी रुपये आहे, तर पलाशची एकूण संपत्ती 20 ते 41 कोटी रुपये दरम्यान आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलाश मुच्छल – स्मृती मानधना यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.