Shikhar Dhawan : शिखर धवनसोबत वारंवार दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण ? गब्बरला मिळाली जीवनसाथी?
भारतीय क्रिकेट संघातील गब्बर नावाने ओळखला जाणारा, लोकप्रिय खेळाडू शिखर धवन त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पाहण्यासाठी शिखर धवन नुकताच दुबईला पोहोचला.

भारतीय क्रिकेट संघातील गब्बर नावाने ओळखला जाणारा, लोकप्रिय खेळाडू शिखर धवन त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पाहण्यासाठी शिखर धवन नुकताच दुबईला पोहोचला होता. यादरम्यान तो त्याच्या सर्व जुन्या मित्रांना भेटला. या मुलाखतीदरम्यान तो त्याच्या जुन्या स्टाइलमध्ये दिसला ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे. जातो. मात्र, या सगळ्यामध्ये धवन ज्या गोष्टीबद्दल सर्वात जास्त चर्चेत होता, ती म्हणजे त्याचा शेजारी बसलेली सुंदर मिस्ट्री गर्ल
खरंतर शिखर धवनने 2023 मध्ये भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन आयशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला. धवन आणि आयशा लग्नाच्या 11 वर्षानंतर वेगळे झाले. तेव्हापासून तो एकटाच आहे. या काळात त्यांच्या करिअरमध्येही बराच चढउतार झाले. त्यानंतर त्याने धक्कादायक निर्णय घेत गेल्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. याचदरम्यान शिखर नुकताच एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला आणि चर्चा सुरू झाली, ती नेमकी आहे तरी कोण ?
Shikhar Dhawan spotted at the airport today with a mystery girl ! pic.twitter.com/VrbwIoVl4o
— Vijay (@veejuparmar) March 7, 2025
धवनसोबत दिसणारी ती मुलगी आहे तरी कोण ?
चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान भारताच्या मॅचदरम्यान शिखर धवन सोबत जी मिस्ट्री गर्ल होती, तीचं नाव सोफी शाइन आहे. सोफी ही आयर्लंडची रहिवासी आहे. सोफी व्यवसायाने प्रॉडक्ट कन्स्लटंट आहे. भारत-बांगलादेश सामन्यापूर्वीही धवन आणि सोफी विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडली होती. त्यावेळी चाहत्यांच्या ते फारसे लक्षात आले नाही, मात्र स्टेडियममध्ये पुन्हा एकत्र दिसल्यानंतर दोघांबददलच्या चर्चांना उधाण आले.
View this post on Instagram
शिखर धवन आणि सोफी शाइन हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात. त्यामुळे दोघेही गुपचूप एकमेकांना डेट करत असल्याचे मानले जात आहे. धवन किंवा सोफी या दोघांनीही या नात्यावर भाष्य केले नसले तरी टीम इंडियाच्या गब्बरला नवे प्रेम मिळाल्याची चर्चा सोशल मीडियावर नक्कीच रंगली आहे.
