एकाच सामन्याद्वारे वेस्‍ट इंडिजच्या 6 खेळाडूंचे पदार्पण, 42 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

| Updated on: Jan 20, 2021 | 4:02 PM

वेस्‍ट इंडिजचा (West Indies) संघ सध्या बांग्लादेश (Bangladesh) दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये आजपासून एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे.

एकाच सामन्याद्वारे वेस्‍ट इंडिजच्या 6 खेळाडूंचे पदार्पण, 42 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती
Follow us on

ढाका : वेस्‍ट इंडिजचा (West Indies) संघ सध्या बांग्लादेश (Bangladesh) दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये आजपासून एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना ढाका येथे सुरु आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांकडून अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजने या सामन्याद्वारे त्यांच्या 6 नव्या खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली आहे. एकाच सामन्यातून सहा खेळाडूंनी पदार्पण करणे हा एक रेकॉर्ड आहे. तर दुसऱ्या बाजूला बांग्लादेशकडून जलदगती गोलंदाज हसन महमूदने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. दरम्यान ढाकामध्ये सुरु असलेला हा सामना पावसामुळे तीन षटकांनंतर थांबवण्यात आला आहे. (WI vs BAN 6 debutants from west indies in first odi)

वेस्ट इंडिजकडून या सामन्याद्वारे अकेल होसेन, आंद्रे मॅक कार्थी, चेमार होल्डर, जोशुआ डी सिल्वा, कायले मेयर्स आणि नकुमाब बोनर यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. 1978 नंतर असं पहिल्यांदाज घडतंय. यापूर्वी 1978 मध्ये वर्ल्ड सिरीजमुळे वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले नव्हते. त्यामुळे या सामन्यातून 6 नव्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलियाने तो सामना दोन विकेट राखून जिंकला होता.

वर्ल्ड कप सुपर लीगमधील पहिलाच सामना

दोन्ही संघ वर्ल्ड कप सुपर लीगमधील त्यांचा पहिलाच सामना खेळत आहेत. या स्पर्धेतील प्रदर्शनाच्या जोरावरच हे संघ 2023 मध्ये खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. दरम्यान, तमीम इक्बालला नऊ महिन्यांपूर्वीच मशरफे मुर्तजाच्या जागी कर्णधार बनवलं आहे. कर्णधार म्हणून तमीम इक्बालच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशचा संघ आता पहिल्यांदाज एकदिवसीय मालिका खेळत आहे. दरम्यान या संघात शाकीब अल हसनने पुनरागमन केलं आहे. बंदीनंतर शाकिबसाठी ही पहिलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आहे. शाकिबने यापूर्वी बांग्लादेशच्या कसोटी आणि टी-20 संघाचं नेतृत्व केले आहे. 33 वर्षीय शाकीबने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वंगबंधू टी-20 कप स्पर्धेद्वारे क्रिकेटमध्ये कमबॅक केलं होतं.

हेही वाचा

ICC Test Rankings मध्ये रिषभ पंतचा जलवा, विराट कोहलीला अनुपस्थितीचा फटका

‘तुला’ परमयोद्धा म्हणून ओळखलं जाईल, रवी शास्त्रींचं ड्रेसिंग रुममध्ये तीन मिनिटांचं भाषण

गर्वाचं घर खाली करणारे ‘अजिंक्य’ वास्तूपुरूष!

(WI vs BAN 6 debutants from west indies in first odi)