ICC Test Rankings मध्ये रिषभ पंतचा जलवा, विराट कोहलीला अनुपस्थितीचा फटका

ICC Test Rankings मध्ये रिषभ पंतचा जलवा, विराट कोहलीला अनुपस्थितीचा फटका
रिषभ पंत

ICC Test Rankings : विकेटकीपर बॅटसमनच्या रँकिंगकमध्ये रिषभ पंत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

Yuvraj Jadhav

|

Jan 20, 2021 | 3:36 PM

नवी दिल्ली: भारताचा विकेटकीपर रिषभ पंतनं ब्रिस्ब्रेन येथील अंतिम कसोटीत 89 धावांची आक्रमक खेळी करत भारताला सामन्यासाह मालिका विजय मिळवून दिला. रिषभ पंतला 89 धावांच्या खेळीचा फायदा झाल असून आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये तो 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. विकेटकीपर बॅटसमनच्या रँकिंगकमध्ये पंत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्टिंटन डी कॉक 15 व्या स्थानावर आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचं स्थान ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशचेंज यानं पटकावलं आहे. ( ICC Test Rankings Rishabh Pant get first rank in wicketkeeper batsman ranking)

विराट कोहलीला फटका

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत फक्त 1 कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला फटका बसला आहे. विराटची टेस्ट रँकिंगमध्ये घसरण झाली असून तो चौथ्या क्रमांकावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर असून न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लडंचा बॅटसमन जो रुट पाचव्या स्थावर पोहोचला आहे.

चेतेश्वर पुजाराचं रँकिंग सुधारलं

चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडिच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. 760 गुणांसह चेतेश्वर पुजारानं सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाला विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणे 748 गुणांसह 9 व्या स्थानावर आहे. शुभमन गिलनं 47 व्या स्थानावर आहे.

आश्विन, जसप्रीत बुमराह टॉप टेनमध्ये

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील चांगल्या कामगिरीचा फायदा टीम इंडियाचे गोलंदाज रवीचंद्रन आश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना झाला आहे. आश्विन 8 व्या तर जसप्रीत बुमराह 9 व्या स्थानावर आहे. मोहम्मद सिराज पहिल्या 45 गोलंदाजांच्या यादीत 32 व्या स्थानावर पोहोचला आहे. मोहम्मद सिराजनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 विकेट घेतल्या होत्या.

संबंधित बातम्या:

स्टम्पच्या मागे उभा राहून रिषभ पंत नेमकं काय गात होता; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘तुला’ परमयोद्धा म्हणून ओळखलं जाईल, रवी शास्त्रींचं ड्रेसिंग रुममध्ये तीन मिनिटांचं भाषण

( ICC Test Rankings Rishabh Pant get first rank in wicketkeeper batsman ranking)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें