Video : दर्यादिल अजिंक्य रहाणे…, 100 वी टेस्ट खेळणाऱ्या नॅथन लायनला ‘खास गिफ्ट’!

Video : दर्यादिल अजिंक्य रहाणे..., 100 वी टेस्ट खेळणाऱ्या नॅथन लायनला 'खास गिफ्ट'!

ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू नॅथन लायनला अजिंक्य रहाणेने स्पेशल गिफ्ट दिलंय. अजिंक्यच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा होते आहे.

Akshay Adhav

|

Jan 20, 2021 | 8:47 AM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत जाऊन लोळवण्याचा पराक्रम टीम इंडियाने केला. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ही अद्वितीय कामगिरी केली. अजिंक्यने आपल्या नेतृत्व गुणाने भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावली आहेत. ऑस्ट्रेलियात जाऊन अशक्यप्राय वाटणारा मालिका विजय मिळवत अजिंक्यने करोडो भारतवासियांच्या हृदयात हक्काचं स्थान मिळवलंय. तसंच आपल्या नम्रपणाने, प्रामाणिकपणाने आणि खिलाडूवृत्तीने त्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू-प्रेक्षकांनाही आपली नोंद घेण्यास भाग पाडलं आहे. प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू नॅथन लायनला अजिंक्यने स्पेशल गिफ्ट दिलंय. अजिंक्यच्या या कृतीची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा होते आहे. (Ind Vs Aus Ajinkya Rahane presenting Signed To Nathan lyon before lifting Gawaskar Border trophy)

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने भारताविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळताना आपल्या कसोटी कारकीर्दीतला 100 वा सामना खेळला. त्याचा हाच 100 वा सामना भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने आणखीनच यादगार बनवला. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये अजिंक्यने भारताच्या सर्व खेळाडूंच्या सहीसह भारतीय टीमची जर्सी नॅथन लायनला गिफ्ट केली. अजिंक्यने दिलेल्या गिफ्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय खेळाडूंच्या विरुद्ध अनेक कटकारस्थाने रचली. क्षणाक्षणाला भारतीय संघाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक पातळीवर भारतीय संघाचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन संघाकडून झाला. परंतु भारताने टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर कर्णधार अजिंक्यने त्यांच्या खेळाडूला गिफ्ट देऊन खिलाडूवृत्ती जपण्याचा अनोखा संदेश दिला.

मॅच प्रेझेंटेशनवेळी अजिंक्यच्या हाती बॉर्डर गावसकर करंडक सोपवल्यानंतर त्या करंडकासोबत फोटोसेशन करण्यावेळी रहाणेने तो चषक थेट नवोदित खेळाडू टी. नटराजनकडे सोपवला आणि फोटोसेशनवेळी त्याने बाजूला उभ राहणं पसंत केलं. अजिंक्यच्या या कृतीचीही सोशल मीडियावर वाहवा झाली.

रिषभ पंतने विजयी चौकार मारला आणि सगळे खेळाडू जल्लोषासाठी मैदानात धावले. कर्णधार अजिंक्यने मात्र सहकारी खेळाडू रोहित शर्माला कडकडून मिठी मारत कोणतीही घाई गडबड न करता संघातील इतर खेळाडूंना जल्लोष करण्यास संधी दिली. यानंतर सर्व खेळाडू तिरंगा घेऊन मानवंदना देण्यासाठी निघाले. यावेळीही मॅच विनिंग खेळी करणाऱ्या रिषभ पंतच्या हाती अजिंक्यने तिरंगा दिला स्वतः बाजूला झाला. अजिंक्यच्या या कृतींनी क्रिकेटरसिकांचं मन भरुन आलं आणि नकळतपणे ‘व्वा अजिंक्य’… असे शब्द क्रिकेटरसिकांच्या तोंडातून निघाले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली पहिली टेस्ट मॅच खेळून मायदेशी परतला. यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा अजिंक्यच्या खांद्यावर आली. अजिंक्यनेही ती धुरा संकटांचे डोंगर पार करुन लिलया पेलली. अजिंक्यने आपल्या अनेक कृतींनी क्रिकेटप्रेमींची दाद मिळवली. शेवटी एक ही तो दील हैं,कितनी बार जितोगे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटलेली पाहायला मिळाली.

(Ind Vs Aus Ajinkya Rahane presenting Signed To Nathan lyon before lifting Gawaskar Border trophy)

हे ही वाचा

England Tour India | ऑस्ट्रेलियाला धुतलं, आता इंग्लंडला लोळवण्यासाठी भारताचा तगडा संघ सज्ज

सिराज-शार्दुलचा भेदक मारा, पंतचा तडाखा आणि पुजाराची झुंज; भारताच्या विजयाची 5 कारणं

“सौ शहरी… एक संगमनेरी”, अहमदनगरी ‘अजिंक्य’साठी काँग्रेस नेत्याचं हटके ट्विट

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें