Aus vs Ind 4th Test | “सौ शहरी… एक संगमनेरी”, अहमदनगरी ‘अजिंक्य’साठी काँग्रेस नेत्याचं हटके ट्विट

Aus vs Ind 4th Test | सौ शहरी... एक संगमनेरी, अहमदनगरी 'अजिंक्य'साठी काँग्रेस नेत्याचं हटके ट्विट
अजिंक्य रहाणे

अजिंक्यने आपल्या नेतृत्वात अनुभवी खेळाडंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला बॉर्डर गावसकर मालिकेत विजय मिळवून दिला.

sanjay patil

|

Jan 19, 2021 | 6:50 PM

ब्रिस्बेन : टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये रोमांचक झालेल्या चौथ्या कसोटीत (Aus vs Ind 4th Test) ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली. टीम इंडियाचा ब्रिस्बेनवरील हा पहिलाच कसोटी विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम केले. या मालिका विजयामुळे टीम इंडियाचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या खेळाडूंसह मालिका जिंकली. यामुळे अजिंक्यचंही कौतुक केलं जात आहे. महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अजिंक्यसाठी एक हटके ट्विट केलंय. “सौ शहरी…. एक संगमनेरी” असं भन्नाट ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं आहे. (aus vs ind 4 th test congress leader satyajeet tambe unique tweet for ajinkya rahane)

अजिंक्य रहाणे हा मुळचा महाराष्ट्रातील अहमदनगरमधील संगमनेरचा आहे. आपल्या नगरातील मातीतल्या अजिंक्यने भारताला कसोटी मालिका जिंकून दिल्याने संगमनेरमध्येही आनंदाचं वातावरण आहे. टीम इंडियाच्या या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर दिग्गज नेत्यांनीही कौतुक केलं.

रहाणे नावाप्रमाणे ‘अजिंक्य’

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतला. त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. रहाणेने ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. रहाणेचा कॅपटन्सी रेकॉर्ड भन्नाट आहे. रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडिया कसोटीमध्ये आतापर्यंत ‘अजिंक्य’ आहे. रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा चौथा कसोटी विजय ठरला. रहाणेने आतापर्यंत 5 कसोटींमध्ये नेतृत्व केलं आहे. यापैकी 4 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर एक सामना हा अनिर्णित राहिला आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Ajinkya Rahane | ना कोहली, ना बुमराह, नवख्या खेळाडूंना घेऊन अजिंक्य रहाणे कसा जिंकला?

Aus vs Ind 4th Test | व्हिलन होता होता रिषभ पंत हिरो ठरला, निर्णायक क्षणी गियर बदलला!

(aus vs ind 4 th test congress leader satyajeet tambe unique tweet for ajinkya rahane)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें