Mohammed Shami : मोहम्मद शमीला T20 विश्वचषक संघात स्थान मिळेल का ? जाणून घ्या संभाव्य संघ

टीम इंडीयासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

Mohammed Shami : मोहम्मद शमीला T20 विश्वचषक संघात स्थान मिळेल का ? जाणून घ्या संभाव्य संघ
Team india
Image Credit source: AP/PTI
| Updated on: Sep 12, 2022 | 1:11 PM

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात (Australia) T20 विश्वचषक होणार आहे. त्याची आत्तापासून चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाचा (India) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात T20 विश्वचषक टीम इंडिया खेळणार आहे. T20 विश्वचषकात कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण आशिया चषकात खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळण्याची शक्यता अधिक आहे.

टीम इंडीयासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचा फायदा भारतीय संघाला अधिक होईल अशी चर्चा आहे. अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने त्यांचं 71 आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी अशी आहे संभाव्य टीम

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग

राखीव खेळाडू

श्रेयस अय्यर, ईशान किशन आणि मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर

आशिया चषकात टीम इंडियामध्ये गोलंदाजांना महत्त्वाच्या मॅचमध्ये अपयश आल्याने त्यांच्यावरती टीका झाली होती. मोहम्मद शमी तंदुरुस्त असताना त्याला का डावलण्यात आला असा प्रश्न देखील रवी शास्त्री यांनी अपस्थित केला होता. आता बुमराह, दीपक चहर आणि हर्षल पटेल पुर्णपणे तंदुरुस्त मोहमद शमीचे पुन्हा संघात पुनरागमन होणार का, हे पाहावे लागणार आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजांनी आपली कामगिरी चांगली केली होती. पण गोलंदाजांना यश आले नाही, त्यामुळे भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाला हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग यांनी प्रश्न विचारले होते.