AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wisden च्या Playing XI मध्ये तीन भारतीय खेळाडू, मात्र विराट कोहलीसह पाकिस्तानी खेळाडूंना स्थान नाही

विस्डेनने (Wisden) वर्षभरातील कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्लेइंग इलेव्हनची (Wisden World Test Championship Playing XI) निवड केली आहे.

Wisden च्या Playing XI मध्ये तीन भारतीय खेळाडू, मात्र विराट कोहलीसह पाकिस्तानी खेळाडूंना स्थान नाही
Virat Kohli
| Updated on: May 03, 2021 | 10:23 PM
Share

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) आता फक्त एक सामना खेळवला जाणार आहे. यासह या चॅम्पियनशिपचा 2 वर्षांचा टप्पा पूर्ण होईल. अंतिम सामन्यापूर्वी विस्डेनने (Wisden) वर्षभरातील कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्लेइंग इलेव्हनची (Wisden World Test Championship Playing XI) निवड केली असून त्यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आलेला नाही. एकही पाकिस्तानी क्रिकेटपटू यात स्थान मिळवू शकलेला नाही. (Wisden World Test Championship Playing XI, Virat Kohli and Pakistani players have no place)

विराट कोहली (Virat Kohli) हे नाव आता क्रिकेट जगतातील दिग्गजांच्या पंक्तीत आहे. तथापि विस्डेनने त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान दिलेलं नाही. जेव्हा विस्डेन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप प्लेइंग इलेव्हनची (Wisden World Test Championship Playing XI) घोषणा झाली तेव्हा त्यात भारतीय कर्णधाराचे नाव न दिसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विराटप्रमाणे कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूचं नाव या यादीत नाही.

तीन भारतीय खेळाडूंचा समावेश, मात्र विराट कोहलीला स्थान नाही

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील 2 वर्षांच्या कामगिरीच्या आधारे विस्डेनने प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. यात 5 देशांच्या 11 खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. या 11 पैकी 3 खेळाडू भारतीय आहेत पण त्यात विराट कोहलीला स्थान दिलेलं नाही. विस्डेनने रोहित शर्माला सलामीवीर (Rohit Sharma as an Opener), म्हणून निवडलं आहे. तर रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज (Rishabh Pant as an WicketKeeper) म्हणून स्थान देण्यात आलं आहे. तसेच रवीचंद्रन अश्विनची फिरकी गोलंदाज ( R. Ashwin as an Spinner) म्हणून प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली आहे.

3 कांगारु, इंग्लंड-न्यूझीलंडच्या 2-2 खेळाडूंना स्थान

3 भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त 3 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे, 2 इंग्लंडचे, 2 न्यूझीलंडचे आणि 1 श्रीलंकन आहे. मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne), स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि पॅट कमिंस (Pat Cummins) या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विस्डेनने प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं आहे. तर इंग्लंडच्या बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) या दोघांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. तर न्यूझीलंडच्या काइल जॅमिसन (Kyle Jamieson) आणि केन व्हिलियमसन (Kane Williamson) या दोघांना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे. तसेच यात दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) या श्रीलंकन खेळाडूचादेखील समावेश करण्यात आला आहे.

केन व्हिलियमसन विस्डेनचा कर्णधार

विस्डेनने केन व्हिलियमसनला त्यांनी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार केलं आहे. तर श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्नेला रोहित शर्मासह दुसरा सलामीवीर म्हणून स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विस्डेनच्या या यादीमध्ये पाकिस्तान (Pakistan), वेस्ट इंडीज (West Indies), दक्षिण आफ्रिका (South Africa), बांगलादेश (Bangladesh) सारख्या कसोटी खेळणार्‍या राष्ट्रांच्या एकाही खेळाडूला स्थान देण्यात आलेलं नाही.

इतर बातम्या

किंग कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, विराट ठरला दशकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज, कपिल देव आणि सचिनचाही सन्मान

(Wisden World Test Championship Playing XI, Virat Kohli and Pakistani players have no place)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.