Women World Cup ind vs pak : पाकिस्तानने जिंकला टॉस, हरमनप्रीत कौर म्हणाली..

| Updated on: Feb 12, 2023 | 6:50 PM

भारत आणि पाकिस्तानधील महिला आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमधील सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकला आहे. 

Women World Cup ind vs pak : पाकिस्तानने जिंकला टॉस, हरमनप्रीत कौर म्हणाली..
Follow us on

मुंबई : भारत आणि पाकिस्तानधील महिला आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमधील सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकला आहे.  पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्मा मारूफने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन समोर आली आहे. केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर सामना होत आहे.

आम्हाला फलंदाजी करायची होती कारण विकेट जरा अवघड वाटत आहे. आजच्या सामन्यामध्ये स्मृती मंधाना खेळणार नाही त्यामुळे बॅटींग लाईनअपमध्ये आणखी एक बॅटरचा समावेश केला आहे. हरलीन देओलला संधी देण्यात आली आहे. आमची गोलंदाजी उत्तम असून आताचा पार पडलेल्या ट्राई सीरीजमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, अशी प्रतिक्रिया हरमनप्रीत कौरने दिली.

विकेट पाहता आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मोठी धावसंख्या उभारण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आम्हाला आत्मविश्वास आहे कारण आम्ही गेल्या वेळी भारताविरुद्ध जिंकलो पण येथील परिस्थिती वेगळी असल्याचं पाकिस्तानची कर्णधार बिस्मा म्हणाली.

भारत आणि पाकिस्तान याआधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये 6 वेळा आमनेसामने आले आहेत. यामधील 4 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. आताच पार पडलेल्या आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तान संघाने पराभव केला होता. आता भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे ती म्हणजे भारतीय संघातील महत्त्वाची खेळाडू स्मृती मंधानाची दुखापत. टी-20 वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये तिच्या हाताला दुखापत झाली होती.

दरम्यान, पहिल्या सामन्यामध्ये कोण विजयाचा श्रीगणेशा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भारतीय संघ : शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (c), रिचा घोष (w), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग

पाकिस्तान संघ : जावेरिया खान, मुनीबा अली (w), बिस्मा मारूफ (c), निदा दार, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, आयेशा नसीम, फातिमा सना, आयमान अन्वर, नशरा संधू, सादिया इक्बाल