AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीमध्ये कोणाचं पारडं जड?

दोन्ही संघांमधील मागील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिले तर आकडेवारी काय सांगते, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या.

Ind vs Pak T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीमध्ये कोणाचं पारडं जड?
| Updated on: Feb 12, 2023 | 6:05 PM
Share

मुंबई :  भारत आणि पाकिस्तानमध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना होणार आहे. केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर सायंकाळी 6.30 वाजता सामना सुरू होईल. भारतीय संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तान संघाचं बिस्माफ मारूफ नेतृत्त्व सांभाळत आहे. दोन्ही संघांमधील मागील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिले तर आकडीवारी काय सांगते आपण पाहणार आहोत.

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारतीय महिला संघाने आतपर्यंत तब्बल 10 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाने फक्त 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 6 वेळा हे दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. यामध्येही पाकिस्तान संघाला दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. भारताने चारवेळा पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना 2009 खेळवण्यात आला होता ज्यामध्ये भारतीय संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला होता.

भारतीय महिला संघाचा पाकिस्तानविरुद्ध 137 सर्वोच्च स्कोर आहे. जो 2018 साली झालेल्या वर्ल्ड कपवेळी केला होता. तर पाकिस्तान संघाचा 137 सर्वोच्च स्कोर आहे. 2012 च्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्ताना संघाला अवघ्या 68 धावांवर गुंडाळलं होतं. मिताली राज ही पाकिस्तानविरूद्ध वैयक्तिक सर्वोच्च धावांची खेळी करणारी खेळाडू आहे. 2016 च्या आशिया कपच्या फायनलमध्ये मिताली राजने नाबाद 73 धावा केल्या होत्या.

दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये भारताची महत्त्वाची महिला खेळाडू स्मृती मंधाना दुखापतीमुळे खेळणार नाही. स्मृती मॅचविनर खेळाडू असून तिने अनेक सामने एकहाती फिरवत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महिला T20 विश्वचषक 2023 साठी भारत-पाकिस्तान संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.

पाकिस्तानः बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयमान अन्वर, आयशा नसीम, ​​फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, सदफ शम्स, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.

सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.