WPL 2023 : गुजरात जायन्ट्सचं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 202 धावांचं आव्हान, पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ आतुर

| Updated on: Mar 08, 2023 | 9:18 PM

गुजरात जायन्ट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी आतुर आहेत. कोणता संघ विजय मिळवून श्रीगणेशा करतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

WPL 2023 : गुजरात जायन्ट्सचं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 202 धावांचं आव्हान, पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ आतुर
वुमन्स आयपीएलमध्ये कोणता संघ करणार विजयाचा श्रीगणेशा
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायन्ट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना सुरु आहे. गुजरातनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातनं 20 षटकात 7 गडी गमवून 201 धावांची खेळी केली आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं आहे.सोफिया डंकले आणि हर्लीन देओलच्या आक्रमक खेळीपुढे बंगळुरुचे गोलंदाज फिके पडले. सोफिया डंकलेनं 28 चेंडूत 65 धावा, तर हर्लीन देओलनं 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली.दोन्ही संघानं साखळी फेरीतील पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी आतुर आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कामगिरी पाहून आता स्मृती मंधाना आणि विराट कोहलीला ट्रोल केलं जात आहे.

गुजरात जायन्ट्सचा डाव

गुजरातकडून सब्भिनेनी मेघना आणि सोफिया डंकले ही जोडी मैदानात सलामीला उतरली. या जोडीने पहिल्या षटकापासून आक्रमक खेळीला सुरुवात केली. मात्र मेघना तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाली. तिने 11 चेंडूत 8 धावांची खेळी केली. आठ धावा तिने दोन चौकारांच्या मदतीने केल्या.

एक विकेट पडल्यानंतर डंकलेला साथ लाभली ती हर्लीन देओल हीची. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची खेळी केली. सोफिया डंकलेनं आक्रमक खेळी करत 28 चेंडूत 65 धावा ठोकल्या. या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर हर्लीननं आपला आक्रमक अंदाज सुरुच ठेवला. हर्लीनने 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 45 चेंडूत 67 धावा केल्या.

तिसऱ्या गड्यासाठी हर्लीन देओल आणि एशले गार्डनरनं 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एशले गार्डनर 15 चेंडूत 19 धावा करून बाद झाली. दयालन हेमलथानं हर्लीनला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण 7 चेंडूत 16 धावा करून तंबूत परतली. तिने 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्यानंतर अन्नाबेल सुथरलँड 14 धावा करून बाद झाली. तरीही हर्लीननं आपली एकाकी लढत सुरुच ठेवली होती. त्यानंतर स्नेह राणा 2 धावा करून धावचीत झाली.हर्लीन शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत होऊन तंबूत परतली.

दोन्ही संघांची प्लेईंग 11

गुजरात जायन्ट्स संघ | सब्भिनेनी मेघना, सोफिया डंकले, हर्लीन देओल, एशले गार्डनर, अन्नाबेल सुथरलँड, सुष्मा वर्मा, दयालन हेमलथा, स्नेह राणा (कर्णधार), तनुजा कनवार, किम गार्थ, मानसी जोशी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | स्मृती मंधाना (कर्णधार), सोफि डेवि, एलिसे पेरी, हिथर नाईट, रिचा घोष, पूनम खेमनर,कानिका अहुजा, श्रेयंका पाटील, मेगन स्कट, रेणुका सिंह, प्रीती बोस