
WPL 2026 Prize Money : वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL) स्पर्धेचा रोमांचक , थरारक असा फयानल सामना बडोद्याच्या कोटांबी स्टेडियममध्ये पार पडला. आणि त्यामध्ये RCB (रॉयल चैलेंजर्स बंगळुरू)ने दिल्ली कॅपिटल्स (DC) ला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. कॅप्टन स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकत अनोखा इतिहास रचला. 2024 साली आरसीबीने ही स्पर्धा जिंकली होती आणि काल पुन्हा तेच फायनलमध्ये अजिक्य ठरले आणि WPL च्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरलं गेलं. या विजयासह आरसीबीच्या टीमचा, सर्वाधिक विजेतेपद जिंकणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई इंडियन्ससह समावेश झाला. .
RCB च्या टीमवर पैशांची बरसात
वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL 2026) च्या या नेहमी लक्षात राहणाऱ्या विजयानंतर आरसीबीच्या टीमला प्राईज मनी म्हणून कोट्यवध रुपये देण्यात आले. आरसीबीला 6 कोटी रुपयांचं मोठं बक्षीस मिळालं, तर उपविजेती दिल्ली कॅपिटल्सलाही टीमही रिकाम्या हाती परतली नाही. हे प्राईज मनी स्ट्र्क्चर WPL च्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहे. आतापर्यंत, मुंबई इंडियन्सने दोनदा विजेतेपद जिंकले असून त्यांनीही 6 कोटींचे बक्षीस मिळवले आहे, तर RCB ने 2024 च्या हंगामातही बक्षीसाची हीच रक्कम जिंकली होती. यावेळी, RCB ची सातत्यपूर्ण तयारी आणि मजबूत टीमवर्कमुळे त्यांना पुन्हा एकदा विजेतेपद मिळाले.
याशिवाय, स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू (ऑरेंज कॅप), सर्वाधिक विकेट घेणारी (पर्पल कॅप) आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू यांनाही प्रत्येकी 5 लाख रुपये मिळाले. एवढंच नव्हे तर सर्वाधिक षटकार मारणारी खेळाडू आणि सर्वोत्तम स्ट्राईक रेट असलेल्या खेळाडूला देखील प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
RCB कडून विक्रमी धावांचा पाठलाग
WPL 2026 च्या फायनलमधील कालचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठीस खूप खास होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 203 धावा केल्या आणि आरसीबीसमोर विजयासठी 204 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र्
केवळ अंतिम सामन्यातच नाही तर महिला प्रीमियर लीगमध्येही इतक्या मोठ्या लक्ष्याचा कधीही पाठलाग केला गेला नव्हता. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्पर्धेचे विजेतेपद पटकावसाठी विक्रमी धावांचा पाठलाग केला आणि 19.4 षटकांत केवळ 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. आणि ट्रॉफीवरही आपलं नाव कोरलं.