AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL Final : दिल्ली कॅपिटल्सचं दुसऱ्यांदा स्वप्न भंगलं, कर्णधार मेग लेनिंगने सांगतिलं कुठे गमावला सामना

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्स संघावर सहज विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंगने आपलं मन मोकळं केलं. सामन्यात नेमकं काय चूकलं ते सांगितलं.

WPL Final : दिल्ली कॅपिटल्सचं दुसऱ्यांदा स्वप्न भंगलं, कर्णधार मेग लेनिंगने सांगतिलं कुठे गमावला सामना
| Updated on: Mar 17, 2024 | 11:33 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी दुसऱ्यांदा निराशा पडली. दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं होतं. 20 षटकात हे आव्हान सहज सोपं होतं. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हे आव्हान शेवटच्या षटकात पूर्ण केलं. कमी धावांचं आव्हान असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात धीमी झाली. त्यामुळे धावा आणि चेंडूमधील अंतर कमी झालं आणि बंगळुरुवर प्रेशर वाढत गेलं.  पण डोकं शांत ठेवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे खेळाडू खेळत राहिले. अखेर शेवटच्या षटकात विजय मिळवून आणला आणि जेतेपदावर नाव कोरलं. बंगळुरुने 19.3 षटकात 2 गडी गमवून 114 धावांचं आव्हान गाठलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. यासह फ्रेंचायसीने पहिलं जेतेपद मिळवलं आहे.  दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने आपलं मन मोकळं केलं. या सामन्यात नेमकी चूक झाली ते सांगितलं.  “जेतेपद न मिळणंअर्थातच निराशाजनक आहे. फायनल ही या दिवशी चांगले खेळण्याबद्दल असते. आरसीबीचे अभिनंदन, तुम्ही आज रात्री पराभूत केलंत.”, असं मेग लेनिंग हीने सांगितलं.

बिनबाद 64 धावा असताना पुढे सर्व डाव कोसळला, यावर काय सांगशील, तेव्हा मेग लेनिंग म्हणाली की, “आम्ही या स्पर्धेत पाहिल्याप्रमाणे, विचित्र गोष्टी घडतात. संपूर्ण श्रेय आरसीबीला जातं. त्यांनी खरोखरच छान झुंज दिली आणि विजयासाठी पात्र होते. आम्ही खूप योग्य केले. दुर्दैवाने हवं तसं घडलं नाही. अनेक लोकांकडून खूप मेहनत घेतली गेली. सपोर्ट स्टाफचे आभार मानू इच्छितो. क्रिकेट हा एक मजेदार खेळ आहे . तुम्ही कधी जिंकता, कधी हारता.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.