Ranji Trophy 2022 : यशस्वी जैस्वालचा दुहेरी जलवा, मुंबई 47व्यांदा अंतिम फेरीत, युवा स्टार्सनी खेळ फिरवला

| Updated on: Jun 18, 2022 | 8:06 PM

मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना उत्तर प्रदेशचा संघ 180 धावांत गारद झाला. मुंबईने दुसऱ्या डावात 213 धावा केल्या.

Ranji Trophy 2022 : यशस्वी जैस्वालचा दुहेरी जलवा, मुंबई 47व्यांदा अंतिम फेरीत, युवा स्टार्सनी खेळ फिरवला
यशस्वी जैस्वाल
Image Credit source: tv9
Follow us on

Ranji Trophy 2022 : मुंबई क्रिकेट संघ (Mumbai Cricket Association) देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघ मानला जातो. या संघाने सर्वाधिक रणजी विजेतेपद पटकावले आहेत. सध्या हा संघ तितकासा बलाढ्य मानला जात नसला, तरी सर्व काही झुगारून युवा स्टार्सनी भरलेल्या मुंबई क्रिकेट संघाने रणजी ट्रॉफी-2022 च्या (Ranji Trophy-2022) अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत त्यांचा सामना उत्तर प्रदेशशी होता. सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला अंतिम फेरीत स्थान मिळाले. जेथे त्यांचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. या संघाने तब्बल 23 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो यशस्वी जैस्वाल (Yassvi Jaiswal) . या युवा डावखुऱ्या फलंदाजाने या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली.

मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना उत्तर प्रदेशचा संघ 180 धावांत गारद झाला. मुंबईने दुसऱ्या डावात 213 धावा केल्या. दुसऱ्या डावात मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा चमत्कार केला आणि सामन्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी त्यांचा दुसरा डाव चार गडी गमावून 533 धावांवर घोषित करण्यात आला. यासह मुंबईने 47व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

यशाचा दुहेरी धमाका

IPL-2022 च्या शेवटच्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी दमदार फलंदाजी करणाऱ्या यशस्वीने या सामन्यात चांगली फलंदाजी केली. आणि दोन्ही डावात शतक झळकावले. त्याने पहिल्या डावात शतकी कामगिरी केली. तर दुसऱ्या डावात त्याने 181 धावा ठोकल्या. या खेळीत यशस्वीने 372 चेंडूंचा सामना केला आणि 23 चौकारांसह एक षटकार ठोकला. त्याच्याशिवाय अरमान जाफरने 127 धावांची खेळी केली. जाफरने 259 चेंडूंचा सामना करत 15 चौकार आणि दोन षटकार मारले. सर्फराज खान 59 आणि शम्स मुलानी 51 धावा करून नाबाद राहिला. यशस्वीशिवाय हार्दिक तोमरने पहिल्या डावात 115 धावांची खेळी केली. मुलानीने 50 धावा केल्या होत्या. सर्फराजने 40 धावांची खेळी खेळली.

हे सुद्धा वाचा

दिवसाची सुरुवात अशी केली

मुंबईने चौथ्या दिवसाअखेर चार विकेट गमावून 449 धावा केल्या. या धावसंख्येसह मुंबईने पाचव्या दिवशी डाव पुढे खेळत 23 धावांनी आघाडी घेतली. सरफराजने अर्धशतक पूर्ण केले आणि मुलानीने 10 धावा करत अर्धशतक केले. उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या डावात राजकुमार यादवने दोन बळी घेतले. शिवम मावी आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.