Sourav Ganguly ने बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर विराटच्या चाहत्यांना आनंद

विराट कोहलीने कर्णधार पदं सोडलं होतं. त्यावेळी क्रिकेटविश्वात अधिक चर्चा झाली होती.

Sourav Ganguly ने बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर विराटच्या चाहत्यांना आनंद
Virat-Sourav
Image Credit source: AFP
महेश घोलप | Updated on: Oct 14, 2022 | 8:15 AM

सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) बीसीसीआय (BCCI) पदाचा कार्यभार संपत आल्यामुळे त्याला पायउतार व्हावे लागणार आहे. त्याच्या जागी रोजर बिन्नी (Roger Binny) या वर्णी लागणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण यापुर्वी ज्यावेळी विराट कोहलीला कर्णधार पद सोडवं लागलं होतं. त्यावेळी सौरव गांगुली अधिक चर्चेत आला होता.

विराट कोहलीने कर्णधार पदं सोडलं होतं. त्यावेळी क्रिकेटविश्वात अधिक चर्चा झाली होती. त्यामुळे चाहत्यांनी अनेक प्रकारचे मीम्स तयार केले आहेत. ते मीम्स अनेकांनी शेअर केले आहे. तसेच त्यावर अनेकांनी त्यांच्या मनपसंतीचा आशय लिहिला आहे.

सोशल मीडियावर एका विराटच्या चाहत्याने ये करमा है असं म्हटलं आहे. अनेकांनी वेगळ्या कमेंट दिल्या आहेत.

विराट कोहली विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. कारण मागच्या झालेल्या दोन्ही मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us