5 G Service : ऑगस्ट महिन्यातच देशात सुरु होणार 5G ची सेवा, कसे आहे प्लॅंनिंग वाचा सविस्तर.!

| Updated on: Aug 03, 2022 | 9:46 PM

भारतामध्ये 5G सुरु करण्यामध्ये एअरटेल कंपनीचा महत्वाचा रोल राहिला आहे. शिवाय ही सेवा सुरु करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचेही एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल म्हणाले आहेत. नेटवर्क करारांना आता अंतिम रुप दिले जात आहे. एवढेच नाहीतर ऑगस्टमध्येच ही सेवा सुरु करीत असताना आनंदही होत असल्याचे विट्टल यांनी सांगितले आहे.

5 G Service : ऑगस्ट महिन्यातच देशात सुरु होणार 5G ची सेवा, कसे आहे प्लॅंनिंग वाचा सविस्तर.!
5G, प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : भारतामधील प्रत्येक नागरिकाला प्रतिक्षा लागली आहे ती, 5G च्या सेवेची. गेल्या अनेक दिवसांपासून केवळ चर्चा होत आहे पण आता ही प्रतिक्षा याच महिन्यात पूर्ण होईल असे (Airtel Company) एअरटेल कंपनीने स्पष्ट केले आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या (Agreement) करारावरदेखील संबंधित कंपन्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अंतिम टप्प्यात डिव्हाइस तैनात करण्यास सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी केल्या गेलेल्या लिलावात एअरटेलने बोली लावली होती. एवढेच नाहीतर या कंपनीने एअरटेलने एरिक्सन आणि नोकियाशी संपर्क साधले आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थापकीय कामकाज पूर्ण झाले असून सॅमसंगबरोबरची (Partnership) भागीदारी या वर्षापासून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.

43 हजार 84 कोटींचे स्पेक्ट्रम खरेदी

5G साठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. सुनील मित्तल यांच्या नेतृत्वामध्ये या कंपनीने 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ बँडमध्ये 19 हजार 867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम नुकतेच विकत घेतले होते. या सर्वांची किंमत 43 हजार 84 कोटी स्पेक्ट्रमची खरेदी केली आहे.

ऑगस्टमध्येच होणार सेवा सुरु

भारतामध्ये 5G सुरु करण्यामध्ये एअरटेल कंपनीचा महत्वाचा रोल राहिला आहे. शिवाय ही सेवा सुरु करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचेही एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल म्हणाले आहेत. नेटवर्क करारांना आता अंतिम रुप दिले जात आहे. एवढेच नाहीतर ऑगस्टमध्येच ही सेवा सुरु करीत असताना आनंदही होत असल्याचे विट्टल यांनी सांगितले आहे. एअरटेल याच महिन्यामध्ये ही सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासूनची प्रतिक्षा आता संपुष्टात येणार आहे.

डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळणार चालना

5G मुळे स्वप्न तर सत्यामध्ये उतरत आहेच पण त्याचबरोबर डिडिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासात अमूलाग्र बदल होणार आहे. त्यामुळे केवळ करमणूकच नाही तर अर्थकारणालाही बळकटी मिळणार आहे. दूरसंचार क्षेत्रामुळे सर्वच क्षेत्राला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.