90 टक्के लोकांना नाही माहिती यु ट्यूबचे हे जबरदस्त फिचर, तुमच्यासाठीसुद्धा असू शकते नवीन

यु ट्यूबवर (YouTube)  अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी आपला अनुभव सुधारू शकतात. कंपनी वेळोवेळी नवीन फीचर्स देखील ऑफर करते जेणेकरुन वापरकर्त्याचा अनुभव अधिक सुलभ करता येईल. आज आम्‍ही तुम्‍हाला यूट्यूबच्‍या एका अप्रतिम फिचरबद्दल सांगणार आहोत. हे

90 टक्के लोकांना नाही माहिती यु ट्यूबचे हे जबरदस्त फिचर, तुमच्यासाठीसुद्धा असू शकते नवीन
यु ट्यूब
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 05, 2023 | 5:45 PM

मुंबई : गुगलच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यु ट्यूबवर (YouTube)  अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी आपला अनुभव सुधारू शकतात. कंपनी वेळोवेळी नवीन फीचर्स देखील ऑफर करते जेणेकरुन वापरकर्त्याचा अनुभव अधिक सुलभ करता येईल. आज आम्‍ही तुम्‍हाला यूट्यूबच्‍या एका अप्रतिम फिचरबद्दल सांगणार आहोत. हे तुमचा व्हिडिओ पाहण्याचा अनुभव बदलेल. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही फोन स्क्रीन रोटेड एका विशीष्ट पद्धतीने म्हणजेच स्क्रिन रोटेशन ऑफ असतानासुद्धा बदलू शकता. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या फोनला विशीष्ट पद्धतीने टच करायचे आहे. म्हणजेच, तुम्ही हे काम फक्त स्क्रीनला वरपासून खालपर्यंत आणि वरच्या बाजूला विशिष्ट पद्धतीने स्पर्श करून करू शकता. अनेकांना याबद्दल माहिती नाही. आपण सर्व सहसा हॉरिझंटल मोडमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर दिलेले साइड बटण किंवा ऑटो रोटेशन वापरतो. त्याचप्रमाणे, उभ्यामध्ये काही पाहण्यासाठी, आपण फोन सरळ करतो किंवा उभ्या पर्यायावर क्लिक करतो. पण आतापासून तुम्ही हे काम खास पद्धतीने करू शकता.

हे वैशिष्ट्य असे काम करते

समजा तुम्ही उभ्या विंडोमध्ये व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला तो हॉरिझंटल मोडमध्ये पहायचा आहे. कोणत्याही पर्यायावर क्लिक करण्याऐवजी, तुम्हाला फक्त व्हिडिओ वर स्क्रोल करायचा आहे. त्याचप्रमाणे, उभ्या, आडव्या व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी डाउनसाइडकडे स्क्रोल करावे लागेल. असे केल्याने, व्हिडिओची स्थिती आपोआप बदलेल. म्हणजेच, व्हिडिओला विशिष्ट पद्धतीने स्पर्श करताच त्याचे स्थान बदलेल. माहितीसाठी एक व्हिडीओ देत आहोत जेणेकरून तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल.