Airtel ची Jio ला टक्कर, 3 नवीन रिचार्ज प्लॅन लाँच, 22 OTT ॲप्सचे सब्सक्रिप्शन
Airtel fesitve offer : Airtel ने तीन नवीन रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅनमध्ये 10GB मोफत डेटा, 22 OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन यासह अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. काय आहेत त्याचे फायदे. जिओपेक्षा ते स्वस्त आहेत की महाग जाणून घ्या.
एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी फेस्टिव्ह ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत 3 नवीन रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आले आहेत. एअरटेलचे हे रिचार्ज प्लॅन जिओच्या वर्धापन दिनाच्या ऑफरशी स्पर्धा करत सादर करण्यात आले आहेत. Airtel ने Jio प्रमाणेच आपला प्लान लॉन्च केला आहे. ही 6 दिवसांची मर्यादित कालावधीची ऑफर आहे. ही ऑफर 6 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे, जी 11 सप्टेंबर 2024 पर्यंत चालेल.
एअरटेलचा 979 रुपयांचा प्लॅन
हा प्लान दररोज 2GB डेटासह देतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. 22 पेक्षा जास्त OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 10GB डेटा कूपन देण्यात आले आहे.
एअरटेलचा 1029 रुपयांचा प्लान
हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच, डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन दिले जाईल. हा प्लॅन 22 OTT ॲप्स सबस्क्रिप्शनसह येईल. तसेच, 28 दिवसांसाठी 10 GB डेटा कूपन दिले जाईल.
एअरटेलचा 3599 रुपयांचा प्लॅन
हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येईल. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जाईल. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 22 OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन दिले जाईल. तसेच, 10GB डेटा कूपन सुविधा उपलब्ध असेल.
जिओ वर्धापन दिन ऑफर
ही ऑफर 5 सप्टेंबरपासून सुरू होईल, जी 10 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू राहील. एअरटेलप्रमाणेच या प्लॅनमध्ये 10GB डेटा ॲड ऑन लाभही दिला जात आहे. या ऑफर अंतर्गत तीन प्लॅन सादर करण्यात आले आहेत. Jio या तीन प्लॅनसह 28 दिवसांसाठी 10 OTT ॲप्स आणि 10GB डेटा व्हाउचर देत आहे.
jio rs 899 चा प्लान
दररोज 2GB डेटाची सुविधा. वैधता ९० दिवसांची असेल. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग असेल. सोबत फ्री रोमिंग, दररोज १०० एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा उपलब्ध आहे.
jio Rs 999 चा प्लान
या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटाची सुविधा आहे. या प्लॅनची वैधता ९८ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह १०० मोफत एसएमएस उपलब्ध आहेत. तसेच अमर्यादित 5G डेटा उपलब्ध आहे.
3599 रुपयांची योजना
हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच दररोज १०० मोफत एसएमएस दिले जात आहेत. याशिवाय अनलिमिटेड 5G आणि व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे.
जिओ आणि एअरटेलमध्ये कोण सर्वोत्तम आहे?
Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्यांनी समान योजना सादर केल्या आहेत. जिओचे सुरुवातीचे दोन प्लॅन एअरटेलच्या तुलनेत 89 रुपये आणि 39 रुपयांनी महाग असतील.