
भारतीय टेलिकॉम कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी कमी किमतीच्या चांगल्या सुविधा देणारे प्लॅन लाँच करत असतात. जर तुम्ही कमी खर्चात जास्त काळ टिकणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेल त्याच्या ग्राहकांसाठी 161 रुपयांच्या किंमतीत 30 दिवसांची वैधता देत आहे. या प्लॅनमधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड डेटाचाही फायदा मिळत आहे. एअरटेल आणखी अनेक प्लॅन ऑफर करत आहे जे आणखी चांगल्या फायद्यांसह येतात. याव्यतिरिक्त तुम्ही विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन देखील मिळवू शकता.
एअरटेलचा हा प्लॅन घेतल्यास तुम्हाला 30 दिवस कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्ही डेटाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल. 30 दिवसात 12 जीबी डेटा वापरता येईल. दरम्यान एअरटेलकडून याच किमतीच्या रेंजमधील इतर प्लॅन्स पाहिल्यास तुम्हाला यापेक्षा जास्त डेटा बेनिफिट्स मिळू शकतात.
एअरटेलच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांच्या वैधतेसह 15 जीबी डेटा फ्री मिळतो. तुम्ही या डेटाचा वापर ऑनलाइन चित्रपट, वेब सीरिज पाहण्यासाठी आणि गेम खेळण्यासाठी करू शकता. या प्लॅनमध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियमचे सब्सक्रिप्शन देखील यात समाविष्ट आहे. सोनी लिव्ह आणि पंजाबी चित्रपटांचा समावेश असलेल्या चौपाल ॲपसह 22 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचे तुम्हाला सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
एअरटेलच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाचा फायदा मिळतो. 199 रुपयांच्या खर्चात तुम्ही दररोज 2 जीबी डेटा वापरू शकता. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियमचे सब्सक्रिप्शन देखील समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त तुम्ही इतर कोणताही प्लॅन पाहू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार कोणतीही योजना निवडू शकता.