AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 ऑगस्टपासून सुरू होणार ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल, सॅमसंगसह या ब्रँडेड फोनवर मिळणार मोठी सूट

अॅमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल 2026 7 ऑगस्ट रोजी सुरू होईल. या सेलदरम्यान अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्स सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. ग्राहकांना बँक ऑफर्स आणि कॅशबॅक यांसारखे अतिरिक्त फायदेही मिळतील. चला तर कोणत्या फोनवर सूट मिळत आहे ते जाणून घेऊयात.

7 ऑगस्टपासून सुरू होणार ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल, सॅमसंगसह या ब्रँडेड फोनवर मिळणार मोठी सूट
Amazon Great Freedom Sale Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 3:39 PM
Share

ॲमेझॉनने आपल्या ग्रेट फ्रीडम सेल 2026 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. 7 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये सॅमसंग, वनप्लस, आयक्यूओ, रियलमी, रेडमी आणि लावा यांसारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर भरीव सवलत दिली जाणार आहे. कंपनीने अनेक फ्लॅगशिप आणि मिड-रेंज स्मार्टफोन्सच्या विक्री किमतीही जाहीर केल्या आहेत. याव्यतिरिक्त ग्राहकांना बँक ऑफर्स आणि कॅशबॅकद्वारे अतिरिक्त बचतीचा लाभ मिळेल. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट उपलब्ध केली आहे ते जाणून घेऊयात.

फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर मोठी सूट उपलब्ध

ॲमेझॉनने त्यांच्या ‘ग्रेट फ्रीडम सेल’ दरम्यान मायक्रोसाइटवर अनेक स्मार्टफोन ऑफर्सबद्दल माहिती शेअर केली आहे. नुकताच लाँच झालेला सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा 1 लाख 99 हजार 999 रूपयांऐवजी 1 लाख 90 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. याचा अर्थ ग्राहक या फोनवर 9 हजार रूपयांपर्यंत बचत करू शकतात. वनप्लस 15, ज्याची सामान्य किंमत 89 हजार 999 रूपये आहे. तर सेल दरम्यान 81 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. कंपनीने हे देखील निश्चित केले आहे की सॅमसंग गॅलेक्सी एस25 अल्ट्रा आणि सॅमसंग गॅलेक्सी एम47 5जी हे फोनदेखील कमी किमतीत उपलब्ध होतील.

या स्मार्टफोन्सवर उत्तम ऑफर्स देखील उपलब्ध

ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल दरम्यान OnePlus 13S, Redmi A7 Pro 5G, iQOO Z11 Lite 5G, Realme Narzo 100X, iQOO 15R, OnePlus Nord CE 6 आणि Lava Bold N2 सारखे स्मार्टफोन्सदेखील सवलतीत उपलब्ध असतील. कंपनीच्या माहितीनुसार, Realme Narzo 100X ची किंमत ३१,९९९ रुपयांवरून १९,४९९ रुपयांपर्यंत कमी केली जाईल. iQOO Z11 Lite 5G ३३,९९९ रुपयांऐवजी १७,९९९ रुपयांना आणि OnePlus 13S ५७,९९९ रुपयांऐवजी ४९,९९९ रुपयांना उपलब्ध होईल. या किमतींमध्ये बँक सवलतींचा समावेश आहे.

बँक ऑफर्स आणि कॅशबॅकद्वारे अतिरिक्त बचत

ॲमेझॉनने जाहीर केले आहे की, ‘ग्रेट फ्रीडम सेल’ दरम्यान एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 10 टक्के त्वरित सूट मिळेल. या व्यतिरिक्त ॲमेझॉन पे यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 150 पर्यंतचा अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. ॲमेझॉन पे वर आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के अमर्यादित कॅशबॅक मिळेल. कंपनीने असेही म्हटले आहे की बँक ऑफर्स व्यतिरिक्त ग्राहकांना एक्सचेंज बोनस आणि इतर कॅशबॅक ऑफर्सचाही लाभ घेता येईल.

विक्री 7 ऑगस्टपासून सुरू होईल

ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल 2026 7 ऑगस्ट रोजी सुरू होईल. भारताच्या स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त हा सेल आयोजित करण्यात आला आहे. स्मार्टफोन्स व्यतिरिक्त कंपनीने लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, टीडब्ल्यूएस, घरगुती उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. तथापि काही स्मार्टफोन्सची अंतिम विक्री किंमत आणि ऑफर्स केवळ सेलच्या वेळीच स्पष्ट होतील.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...