ॲमेझॉन देतय गुगल पिक्सल 10 वर चक्क 15 हजार 500 रूपयांची मोठी सुट, जाणून घ्या खास ऑफरबद्दल

जर तुम्ही गुगल पिक्सल 10 हा फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तो खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण तुम्हाला हा फोन 15 हजार 500 रूपयांच्या कमी किमतीत मिळेल आणि तुम्हाला एका वेगळ्या बँक कार्ड डिस्काउंटचाही फायदा होईल. चला तर मग या ऑफरचा लाभ कसा घेता येईल ते जाणून घेऊयात.

ॲमेझॉन देतय गुगल पिक्सल 10 वर चक्क 15 हजार 500 रूपयांची मोठी सुट, जाणून घ्या खास ऑफरबद्दल
Google Pixel 10
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Jun 21, 2026 | 11:12 AM

जर तुम्ही गुगलचा नवीनतम फ्लॅगशिप असलेला पिक्सेल 10 हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे. कारण तुम्हाला हा फोन ॲमेझॉनवर तब्बल 15 हजार 500 रूपयांच्या कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. तसेच या फोनमध्ये तुम्हाला 48-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर, एक स्वच्छ अँड्रॉइड अनुभव, एक उत्तम कॅमेरा आणि अनेक उपयुक्त फिचर्स यात आहेत. या फोन खरेदी करताना तुम्ही बँक कार्ड वापरून 3 हजार रूपयांपर्यंतची अतिरिक्त बचत करू शकाल. गुगलचा हा नवीनतम फोन ॲपल, ओप्पो आणि सॅमसंगसारख्या प्रमुख ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो. चला तर ऑफरनंतर या फोनची किंमत किती झाली आहे हे आजच्या लेखाज जाणून घेऊयात.

भारतात गुगल पिक्सल 10 ची किंमत

हा पिक्सल स्मार्टफोन 79 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झाला होता, पण सध्या हा स्मार्टफोन ॲमेझॉनवर 64 हजार 499 रूपयांच्या किंमतीत विकला जात आहे (किंमत बदलू शकते). याचा अर्थ तुम्ही थेट 15 हजार 500 रूपयांची बचत करू शकता. तसेच या फोनच्या खरेदीवर अतिरिक्त सवलतीसाठी तुम्ही HSBC क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5% टक्क्यांची त्वरित सूट मिळवू शकता. या किंमतीच्या रेंजमध्ये हा फोन आयफोन 17ई, ओप्पो रेनो 15 प्रो मिनी 5जी आणि सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 5 5जी सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो. शिवाय तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटचा फायदाही मिळेल.

गुगल पिक्सल 10 ची फिचर्स

वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या डिव्हाइसमध्ये टेन्सर G5 प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे.

यात 4970mAh बॅटरी असून 30W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे, तसेच 15W पर्यंत वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करते.

या फोनमध्ये 3000 nits पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेली 6.3-इंचाची OLED स्क्रीन आहे. कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 स्क्रीनचे संरक्षण करते.

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 48MP चा रियर कॅमेरा, सोबतच 13MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10.8MP चा टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 10.5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Follow Us