AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon, LED TV : स्वस्त टीव्ही घ्यायचाय! 32 इंची एलईडी टीव्ही फक्त 7 हजारात, वाचा तुमच्या बजेटची बातमी

जर तुमच्याकडे जुना टीव्ही असेल तर तुम्हाला 2 हजार 790 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासोबत 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

Amazon, LED TV : स्वस्त टीव्ही घ्यायचाय! 32 इंची एलईडी टीव्ही फक्त 7 हजारात, वाचा तुमच्या बजेटची बातमी
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 13, 2022 | 3:09 PM
Share

मुंबई : 32 इंचाचा एलईडी टीव्ही (LED TV) सवलतीत म्हणजेच कमी दरात मिळत असेल तर कुणाला नाही आवडणार. आज बाजारात अनेक स्मार्ट टीव्ही (Smart TV) आहेत त्यापैकी Samsung, Redmi, Sony, OnePlus सारख्या कंपन्यांचे LED टीव्ही चर्चेत असतात. हे एलईडी टीव्ही घेण्यासाठी देखील ग्राहक आकर्षीत होतात. मात्र,  ते खूप महाग आहेत. प्रत्येकाच्या बजेटमध्ये ते येतातच असंही नाही. पण, बाजारात असे अनेक टीव्ही आहेत जे तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. तेही अगदी सहज. तुम्ही म्हणाल कमी किंमतीत म्हणजे जुने किंवा सेकंडहॅड का, तर मुळीच नाही. हे टीव्ही देखील नवेच पण कमी किंमतीचे आणि भरपूर फीचर्स देणारे.  असे बरेच लोक आहेत ज्यांना स्मार्ट टीव्हीची गरज नाही आणि सामान्य एचडी टीव्ही घेणं ते लोक पसंत करतात. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर आज आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध अशाच एका HD रेडी एलईडी टीव्हीबद्दल माहिती देत ​​आहोत. तो तुम्हाला 7 हजार 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊया या टीव्हीची किंमत, ऑफर्स आणि फीचर्सविषयी.

स्वस्त टीव्ही घेणार?

eAirtec 81 cms (32 इंच) HD रेडी LED TV 32DJ हा 32-इंचाचा टीव्ही 11 हजार 400 ऐवजी 7 हजार 250 मध्ये उपलब्ध असेल. यावर 4 हजार 150 रुपयांपर्यंत ऑफर दिली जात आहे. आता एवढ्या कमी किमतीत 32 इंचाचा टीव्ही मिळणार म्हणजे ऑफर चांगलीच म्हणावी लागेल. नाही का! तुम्ही 341 रुपयांचा EMI भरून देखील ते खरेदी करू शकता. याशिवाय जर तुमच्याकडे जुना टीव्ही असेल तर तुम्हाला 2 हजार 790 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासोबत 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

टीव्हीचे फीचर्सही वाचा

वैशिष्ट्य काय आहे, हे देखील वस्तू घेण्याआधी जाणून घ्यायला हवे. यात 32-इंचाचा डिस्प्ले आहे. ज्याचे पॅनल HD आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1366 x 768 आहे. त्याचा रिफ्रेश दर 60Hz आहे. यात 1 HDMI पोर्ट आहे. तसेच 2 पोर्ट देण्यात आले आहेत. जे पेन ड्राइव्ह किंवा हार्ड डिस्क ड्रायव्हर्सना जोडण्यास मदत करतील. यात  हेडफोन पोर्ट देखील आहे. फोनमध्ये 20W आउटपुट देण्यात आला आहे. त्याचे डिस्प्ले पॅनल A+ ग्रेड IPS आहे. हे प्रीमियम फिनिशसह येते. यामुळे आता कसलाही विचार का करताय, मोबाईल घ्या आणि स्वस्तातला टीव्ही खरी आणा.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?