गूगल क्रोमने आणले आश्चर्यकारक फिचर, आता आपण वेबसाईटवर दिलेली प्रत्येक माहिती करु शकता ट्रॅक

आपल्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी, गूगलने गेल्या आठवड्यात आपल्या सर्चमध्ये आणखी एक फिचर आणले जे लोकांना मोबाईलवरील मागील 15 मिनिटांची ब्राउझिंग हिस्ट्री त्वरीत हटविण्यास अनुमती देईल.

गूगल क्रोमने आणले आश्चर्यकारक फिचर, आता आपण वेबसाईटवर दिलेली प्रत्येक माहिती करु शकता ट्रॅक
गूगल क्रोमने आणले आश्चर्यकारक फिचर, आता आपण वेबसाईटवर दिलेली प्रत्येक माहिती करु शकता ट्रॅक
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 4:50 PM

नवी दिल्ली : सर्च इंजिन जायंट गूगल आपल्या क्रोम ब्राउझरसाठी एक नवीन फिचर आणत आहे. या फिचरद्वारे, वापरकर्त्यांना त्यांच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये कोणत्या वेबसाईटवर त्यांची माहिती पोहचली आहे याची माहिती मिळवू शकतात. यासोबतच, येत्या प्रकाशनात गूगल क्रोममध्ये आपल्या ब्राउझिंग हिस्ट्रीमधून साइट हटवण्याचा पर्याय देखील जोडला जाईल. हा गूगल क्रोम 92 अपडेटचा एक भाग आहे. (An amazing feature brought by Google Chrome, now you can track every piece of information provided on the website)

गूगलने मंगळवारी उशिरा एका निवेदनात म्हटले आहे की, अपडेट केलेल्या साईट सुरक्षा नियंत्रणासह, कोणत्या साइट्सना कोणत्या माहितीची अनुमती आहे हे ट्रॅक करणे आम्ही अधिक सुलभ केले आहे. अपडेटेड पॅनेल उघडण्यासाठी फक्त क्रोम अ‍ॅड्रेस बारच्या डाव्या लॉक आयकॉनवर टॅप करा, जे आपण एखाद्या विशिष्ट साईटला कोणत्या परवानग्या दिल्या हे दर्शवेल. तेथून आपण आपले स्थान आणि कॅमेरा यासारख्या गोष्टी शेअर करणे आणि शेअर न करणे यादरम्यान सहजपणे टॉगल करण्यास सक्षम व्हाल.

अ‍ॅड्रेस बार देखील झाला अॅक्शनेबल

क्रोम ब्राउझरचे हे अपडेट युजर्सला अ‍ॅड्रेस बारमध्ये टाईप करुन वापरकर्त्यांना कारवाई करण्यास अनुमती देईल. उदाहरणार्थ, युजर्सने ‘Safety Check’ टाईप केले ते पासवर्डची सुरक्षा तपासेल आणि मॅलिशियस एक्सटेंशन स्कॅन करण्यासह बर्‍याच गोष्टी करतात. त्याचप्रमाणे, “manage security settings” किंवा “manage sync” देखील अशा प्रकारे क्रिया करतात आणि वापरकर्त्यांना सेटिंग्जमध्ये जाऊन या क्रिया करण्याची आवश्यकता नाही.

सुरक्षिततेसंदर्भात गुगलने आणखी बरीच वैशिष्ट्ये जोडली

आपल्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी, गूगलने गेल्या आठवड्यात आपल्या सर्चमध्ये आणखी एक फिचर आणले जे लोकांना मोबाईलवरील मागील 15 मिनिटांची ब्राउझिंग हिस्ट्री त्वरीत हटविण्यास अनुमती देईल. आयओएससाठी गुगल अॅपमध्ये वैशिष्ट्य उपलब्ध आहे आणि या वर्षाच्या अखेरीस ते अँड्रॉईड गुगल अॅपवर येत आहे. हे साधन अद्याप डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही.

गुगलने म्हटले आहे की, त्यांनी ‘साइट आयसोलेशन’चाही विस्तार केला आहे, जी एक सुरक्षा सुविधा आहे जा वापरकर्त्यांना चुकीच्या वेबसाईट्सपासून संरक्षण देते. ‘साइट आयसोलेशन’ आता साइट्सच्या ब्रॉडर रेंजसह एक्सटेंशनही कव्हर करेल आणि हे सर्व क्रोम गती सुधारणार्‍या ट्विकसह येते. कंपनीने म्हटले आहे की, येत्या काही आठवड्यांत अँड्रॉईड आणि विंडोज, मॅक, लिनक्स आणि क्रोम ओएसवर नवीन अपडेट आणि फिचर्स क्रोमवर येतील. (An amazing feature brought by Google Chrome, now you can track every piece of information provided on the website)

इतर बातम्या

बीएमसीकडून 4 महिन्यात ‘सँडहर्स्ट रोड’ रेल्वे स्थानकाजवळ पर्जन्य जलवाहिनी, अतिवृष्टीनंतरही पाणी साचले नाही

राज कुंद्राच्या अटकेनंतर पत्नी शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मधून बाहेर?, सेटवर गैर हजेरीमुळे चर्चांना उधाण!

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....