तुमच्या Android फोनमधील अ‍ॅप्स क्रॅश होतायत? ‘या’ स्टेप्स फॉलो करा आणि प्रॉब्लेम सोडवा

| Updated on: Mar 23, 2021 | 5:17 PM

तुम्हाला तुमच्या Android स्मार्टफोनवरील अ‍ॅप्स हाताळताना काही समस्यांचा सामना करावा लागतोय का? तर या समस्येला तोंड देणार तुम्ही एकटेच नाही.

तुमच्या Android फोनमधील अ‍ॅप्स क्रॅश होतायत? या स्टेप्स फॉलो करा आणि प्रॉब्लेम सोडवा
smartphone
Follow us on

मुंबई : तुम्हाला तुमच्या Android स्मार्टफोनवरील अ‍ॅप्स हाताळताना काही समस्यांचा सामना करावा लागतोय का? तसं असेल तर या समस्येचा सामना करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. कारण जगभरातील बरेच युजर्स या समस्येशी झगडत आहेत. दरम्यान, गुगलंने असे म्हटले आहे की ते सध्या हा बग फिक्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. टेक जायंटने गूगल वर्कस्पेस पेव वर अँड्रॉइडवर जीमेलसंबंधीच्या काही मुद्द्यांची कबुली दिली आहे. जोपर्यंत या समस्येचे निराकरण होत नाही (बग फिक्स होत नाही) तोपर्यंत Google ने युजर्सना डेस्कटॉप वेरिएंट वापरण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही काळापासून, गुगल पे, जीमेल आणि क्रोमला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. (how to fix android apps,Google Apps,google,android apps crashing,android apps)

तुम्ही या समस्येमधून बाहेर पडू इच्छित असल्यास, तुम्ही Android सिस्टम वेबव्ह्यू अनइन्स्टॉल करून क्रॅश टाळू शकता. Google ने सल्ला दिला आहे की, “प्रभावित युजर्स जीमेल अ‍ॅन्ड्रॉयड अॅपऐवजी डेस्कटॉप जीमेल वेब इंटरफेस वापरू शकतात.” सॅमसंगने देखील हा मुद्दा मान्य केला आणि त्यासाठी तोडगा सुचवला आहे. सॅमसंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले आहे की, कृपया वेब अपडेट काढून टाका आणि फोन रिस्टार्ट करा.

ही समस्या अँड्रॉइड सिस्टम वेबव्ह्यू नावाच्या एका सिस्टम कंपोनेंटमुळे निर्माण झाली आहे, जी अँड्रॉयड अ‍ॅप्सना वेब कंटेंट दाखवण्यास मदत करते. प्रभावित युजर्सनी सांगितले आहे की Android वरील Gmail अॅप क्रॅश होत आहे.

प्रॉब्लेम सोडवण्यासाठी Samsung ने दिलेल्या टिप्स

सॅमसंगने म्हटलं आहे की, यावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करा. सेटिंग > अ‍ॅप्लिकेशन > वर उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्सवर टॅप करा > शो सिस्टम अ‍ॅप्स > अँड्रॉइड सिस्टम वेबव्ह्यू सर्च करा > अपडेट अनइन्स्टॉलवर क्लिक करा.

WebView अनइन्स्टॉल करण्यासाठीची प्रोसेस

Google Play Store ओपन करा.
My apps & games वर क्लिक करा.
“Installed” टॅब उघडा आणि Android सिस्टिम WebView वर क्लिक करा.
अनइन्स्टॉलवर टॅप करा आणि कन्फर्म करा.
आता डिव्हाईस रिस्टार्ट करा.

Google ने Android WebView आणि Chrome दोन्ही अ‍ॅपचं अपडेट पुश करुन ही समस्या सोडवली असल्याचे सांगितलं जात आहे. Android WebView व्हर्जन 89.0.4389.105 मध्ये फिक्स केलंय. त्यामुळे हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये क्रॅश होण्याची शक्यता मावळली आहे. तुम्हाला Google Chrome लेटेस्ट व्हर्जनमध्येदेखील अपडेट करावं लागेल. अपडेट Google Play Store मध्ये उपलब्ध आहे.

इतर बातम्या

पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy M12 चा धुमाकूळ, अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत अव्वल

हजाराच्या चार्जरसाठी कोट्यवधींचा दंड, Apple ला ‘या’ देशाचा जोरका झटका

(how to fix android apps,Google Apps,google,android apps crashing,android apps)