Radiation : गॅस सिलिंडरच्या किंमतीत ही अंडरविअर घेऊन जा, मोबाईल रेडिएशनपासून बचाव आणि नपुं…

मोबाईल रेडिएशन सर्वात घातक असतं. त्यामुळे असंख्य आजारांना निमंत्रण मिळतं. त्यामुळे मोबाईल रेडिएशनपासून वाचण्याचा सल्ला दिला जातो. पण तरीही लोक ऐकत नाहीत. त्यामुळे आता या रेडिएशनवर मात करण्यासाठी एक गोष्ट बाजारात आली आहे...

Radiation : गॅस सिलिंडरच्या किंमतीत ही अंडरविअर घेऊन जा, मोबाईल रेडिएशनपासून बचाव आणि नपुं...
Anti Radiation Underwear Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 2:48 PM

नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : मोबाईल वापरताना तो शर्टाच्या किंवा पँटीच्या खिशात ठेवू नये असं सांगितलं जातं. कारण त्यामुळे म्हणे नपुंसकता वाढण्याची शक्यता असते. मोबाईलच्या रेडिएशनमुळे धोका उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून मोबाईल वापरताना शर्ट किंवा पँटीच्या खिशात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मोबाईल ठेवायचा तरी कुठे? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं कारण म्हणजे रेल्वेत, बसमध्ये गर्दीच्या ठिकाणी किंवा बाजारातून जाताना मोबाईल कुठे ठेवावा ही पंचाईत निर्माण होते. पण आता घाबरू नका. तुम्ही मोबाईल खुशाल पँटीच्या खिशात ठेवू शकता. त्यासाठी एक नवीन फंडा शोधून काढला गेलाय.

मोबाईल रेडिएशनपासून वाचण्यासाठी फ्रान्सने आयफोन 12 च्या विक्रीवर बंदी घातली आहे. अॅपलच्या या फोनमधून मोठ्या प्रमाणात रेडिएशन निगत आहे. वायरलेस डिव्हाईसमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनपासून वाचण्याची गरज आहे. फ्रान्सनंतर इतर यूरोपीय देशांनीही ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे मोबाईल रेडिएशन किती डेंजर आहे याचा अंदाज यातून येतो. या मोबाईल रेडिएशनवर मात करण्यासाठी अँटी रेडिएशन अंडरविअर बाजारात विकली जात आहे, त्यावरून हे प्रकरण किती गंभीरपणे घेतलं गेलंय हे दिसून येतं.

किंमत किती?

अँटी रेडिएशन अंडरविअर मोबाईल आणि इतर वायरलेस डिव्हाईसच्या रेडिएशनपासून बचाव करतो, असं या अंडरविअर बनविणाऱ्या कंपन्यांचा दावा आहे. या अंडरविअरमुळे तुम्हाला संरक्षण मिळतं असंही या कंपन्यांचं म्हणणं आहे. आज आम्हीही तुम्हाला स्मार्ट अंडरविअरच्याबाबत सांगणार आहोत. या अंडरविअरमुळे तुमचा घातक रेडिएशनपासून बचाव होईल. आणि या अँटी रेडिएशन अंडरविअरची किंमत एक हजार रुपये आहे. विशेष म्हणजे गॅस सिलिंडरच्या किंमती एवढीच ही किंमत आहे.

99 टक्के संरक्षण

अमेझॉनच्या इंटरनॅशनल साईटवर कोट ऑफ आर्म्सचे अंडरविअर मिळत आहे. ही स्मार्ट अंडरविअर सिल्व्हर फॅब्रिकच्या माध्यमातून ईएमएफ रेडिएशन बंद करतो. अंडरविअरचा धागा हा सिल्व्हर फॅब्रिकने गुंडाळलेला आहे. यामुळे सिल्व्हर वायफाय आणि मोबाईल फोनचा रेडिएशन संपुष्टात आणतो. या अंडरविअरमुळे 99 टक्के संरक्षण मिळणार आहे.

अंडरविअरला पॉकेट

ही अंडरविअर केवळ रेडिएशनपासूनच वाचवत नाही तर ती परिधान केल्यास आरामदायीही वाटते. या अंडरविअरला दोन पॉकेट आहेत. त्यात तुम्ही आवश्यक ते सामान ठेवू शकता. या खिश्यात तुम्ही रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, आयडी किंवा चावीसारख्या गोष्टी ठेवू शकतो. अशा प्रकारे ही अंडरविअर प्रोटेक्ट करते.

स्ट्रेचेबल अंडरविअर

सिल्व्हर लाइन ट्रॅव्हल बॉक्सर ब्रीफला सॉफ्ट मॉडल फॅब्रिकने बनवलं आहे. ही अंडविअर आरामदायी आहे. या अंडरविअरमध्ये 7% Lycra आहे. त्यामुळे बॉडी शेपला चांगला स्ट्रेच मिळतो. ही अंडवरविअर तुम्ही घालून जाऊ शकता आणि वर्कआऊटही करू शकता.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.