AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोन यूजर्सवाल्यांना बसू शकतो मोठा फटका, फोनमधील ‘या’ फीचरचा हॅकर्स घेऊ शकतात फायदा!

आयफोन हा असा मोबाईल आहे जो फीचर्स आणि कॅमेरा  क्वालिटीमध्ये बेस्ट आहे. तसेच ॲपल आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या गॅझेट्समध्ये अधिक सेफ्टी फीचर्स प्रदान करते. यामध्ये आयफोन वापरकर्त्यांना अधिक  प्रायव्हसी फीचर्सही मिळतात.

आयफोन यूजर्सवाल्यांना बसू शकतो मोठा फटका, फोनमधील 'या' फीचरचा हॅकर्स घेऊ शकतात फायदा!
iPhone 15 सीरिजबाबत उत्सुकता शिगेला, चार्जिंग पोर्ट पाहून तुम्हीही व्हाल खूश
| Updated on: Apr 24, 2023 | 11:58 PM
Share

मुंबई : आजच्या काळात आपल्याला आयफोन प्रेमी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. कारण आयफोन हा असा मोबाईल आहे जो फीचर्स आणि कॅमेरा  क्वालिटीमध्ये बेस्ट आहे. तसेच ॲपल आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या गॅझेट्समध्ये अधिक सेफ्टी फीचर्स प्रदान करते. यामध्ये आयफोन वापरकर्त्यांना अधिक  प्रायव्हसी फीचर्सही मिळतात.

आता आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेले हे फीचर्स त्यांच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक ठरताना दिसत आहेत. एका आयफोन वापरकर्त्याचा फोन चोरीला गेला. फोन चोरीला गेल्यानंतर चोराने आयफोनमधील रिकव्हरी की वापरली.  त्यानंतर तो अॅपल आयडीवरून लॉग आउट झाला. तर या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आणि तुमच्यासोबत असा प्रकार होऊ नये यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

Recovery Key ऑप्शन वापरकर्त्यासाठी पडला महागात

एका यूजरचा iphone 14 pro चोरीला गेला. त्यानंतर चोरानी युजरच्या ऍपल आयडीचा पासवर्ड बदलला. पासवर्ड बदलल्यानंतर युजरच्या बँक खात्याचा संपूर्ण तपशील त्या चोराला मिळाला. त्यानंतर युजरचे सगळे पैसे खात्यातून काढले गेले आहेत. हा प्रकार इतर आयफोन वापरकर्त्यांसोबत देखील होऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्यासोबत असा प्रकार घडला तर या धोक्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत जाणून घ्या.

आयफोन सुरक्षा टिप्स

तुमच्‍या iPhone ची प्रायव्हेसी धोक्‍यात येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमचा iPhone अनलॉक करण्‍यासाठी कस्टम अल्फान्यूमेरिक कोड वापरा. आयफोनच्या बायोमेट्रिक सेफ्टी फीचर्ससह फेस आयडी किंवा टच आयडी सक्षम करा.  हे केल्याने तुम्हाला तुमचा पासवर्ड कोणाच्याही समोर टाकावा लागणार नाही. त्यामुळे तुमचा पासवर्ड कोणाला समजणारही नाही.

स्क्रीन टाइम पासवर्डचा करा वापर

सुरक्षेच्या बाबतीत अतिरिक्त काळजी म्हणून तुम्ही स्क्रीन टाइम पासवर्डचा वापर करून तुमची Apple आयडी सेफ्टी अधिक मजबूत करू शकता. तर ही पद्धत वापरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

सगळ्यात आधी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन स्क्रीन टाइम ऑप्शनवर जा.

स्क्रीन टाइम ऑप्शनवर गेल्यानंतर पासकोड सेट करण्यासाठी खाली स्क्रोल करा.

त्यानंतर Content and Privacy Restrictions वर क्लिक करा.

येथे Allow Changes वर जा आणि Account Changes च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Don’t Allow च्या पर्यायावर क्लिक करा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.