Apple चा बिग इव्हेंट, iOS 27 सह अनेक मोठ्या घोषणा, कोणत्या जुन्या आयफोनचा सपोर्ट हटणार ?

Apple कंपनीचा सोमवारी मोठा इव्हेंट होत आहे. या सोहळ्यात कंपनी आपल्या नव्या ऑपरेटिंग सिस्टीम iOS 27 च्या अपडेट व्हर्जनच्या घोषणेसह अनेक मोठ्या घोषणा करणार आहे.

Apple चा बिग इव्हेंट, iOS 27 सह अनेक मोठ्या घोषणा, कोणत्या जुन्या आयफोनचा सपोर्ट हटणार ?
Apple IOS 27
| Updated on: Jun 07, 2026 | 5:47 PM

Apple चा सोमवारी एक मोठा इव्हेंट होत आहे. या इव्हेंटच्या दरम्यान कंपनी अनेक मोठ्या घोषणा करणार आहे. Apple आपल्या iOS 27 या ऑपरेटिंग सिस्टीमचे नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. या सोहळ्यात कंपनी बॅटरी, परफॉर्मन्स आणि AI इंटेग्रेशनवर फोकस करणार आहे. तसेच कंपनी यावेळी जाहीर करणार आहे की iOS 27 कोण-कोणत्या हँडसेटना सपोर्ट करणार आहे याचा खुलासा करणार आहे.

Apple आपला मोठा इव्हेंट आयोजित करणार आहे. ज्याचे नाव वर्ल्डवाईड डेव्हलपर कॉनफ्रन्स 2026 (WWDC 2026)असे आहे. या दरम्यान कंपनी अनेक मोठ्या घोषणा करणार आहे. यात अधिकांश घोषणा सॉफ्टवेअर संबंधित असणार आहेत. या वर्षी कंपनी iOS27 ला सादर करणार आहे. ज्याची वैशिष्ट्ये कंपनी अधिकृतपणे सादर करणार आहे.

भारतीय वेळेनुसार WWDC 2026 या की नोटची सुरुवात सोमवारी रात्री 10:30 वाजता होणार आहे. या इव्हेंट दरम्यान iPhone पासून Apple Watch ला मिळणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या न्यू व्हर्जनला लाँच केले जाणार आहे. ज्याचे नाव iPadOS 27, macOS 27, watchOS 27 असे आहे.

iOS 27 मध्ये काय नवीन ?

iOS 27 या ऑपरेटिंग सिस्टीमची प्रतिक्षा अनेक आयफोन युजर्स करत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कंपनी AI वर खास फोकस करणार आहे आणि अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

Siri ला ChatGPT सारखे जास्त नैसर्गिक बोलण्यासाठी प्रगत केले जाऊ शकते.

कॅमरा, फोटो, वॉलेट आणि शॉर्टकट सारखे सिस्टम ऐप्समध्ये इंटीग्रेशन पाहायला मिळू शकतात.

AI बेस्ड फोटो एडिटिंग टूल्सची घोषणा केली जाणार आहे.

स्मार्ट रायटिंग असिस्टन्स फिचर्सचा समावेश केला जाऊ शकतो.

कॅमरा आणि फोटोज ऐप्समध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

बातम्यानुसार न्यू iOS 27 अंतर्गत कॅमेरा ऐप्सला गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठा अपडेट पाहायला मिळू शकतात. कॅमेरा ऐप्सच्या आत Siri-पावर्ड कॅमरा मोडचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच प्रोफेशन फोटोग्राफी करणाऱ्या युजर्सना जास्त कस्टमाईजेशनचे ऑप्शन मिळू शकतात. AI चा वापर करुन फोटोची बॅकग्राऊंड बदलता येऊ शकणार आहे.

ब्लूमबर्गच्या मार्क गुरमन यांनी नव्या iOS 27 ची तुलना Mac OS X Snow Leopard शी केलेली आहे. ज्याचा संपूर्ण फोकस परफॉर्मेंस आणि बग्स फिक्स संदर्भात होता.
iOS 27 केव्हा अपडेट जारी करणार

iOS 27 चा पहिला डेव्हलपर बिटा लाँच इव्हेंटनंतर लागलीच लागू केला जाऊ शकतो. तर पब्लिक बिटा जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे. नंतर सप्टेंबरमध्ये iOS27 चे अंतिम व्हर्जन लाँच केले जाऊ शकते.

अनेक जुन्या हँडसेटमधून सपोर्ट हटवणार

iOS 27 या ऑपरेटिंग सिस्टीमच्या लाँचिंगच्या वेळी घोषणा केली जाईल की याचा सपोर्ट कोण-कोणत्या आयफोन्स मॉडेल्समध्ये मिळणार आहे. तसेच अनेक जुन्या मॉडेल्ससाठी सपोर्ट बंद केला जाणार आहे.

एका माहितीनुसार iOS 27 केवळ iPhone 12 सिरीज आणि त्यानंतर लाँच होणाऱ्या नव्या मॉडेल्सनाच मिळणार आहे. जर ही माहिती खरी असेल तर Apple कंपनी iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max आणि सेकंड जनरेशन iPhone SE चा सपोर्ट हटवणार आहे.

iPhone 12 सिरीज

iPhone 13 सिरीज

iPhone 14 सिरीज

iPhone 15 सिरीज

iPhone 16 सिरीज

iPhone 17 सिरीज

आदींचा सपोर्ट हटवला जाणार आहे.

मात्र, Apple कंपनीने अधिकृतपणे iOS 27 सपोर्टेड डिव्हाईसची यादी जारी केलेली नाही.

Follow Us