अँड्रॉईडच्या या नवीन फिचरमधून आता अ‍ॅप्स शेअर करता येणार

| Updated on: Feb 18, 2021 | 8:18 PM

अँड्रॉईडच्या या नवीन फिचरमधून आता अ‍ॅप्स शेअर करता येणार (Apps can now be shared with this new feature of Android)

अँड्रॉईडच्या या नवीन फिचरमधून आता अ‍ॅप्स शेअर करता येणार
अँड्रॉईडच्या या नवीन फिचरमधून आता अ‍ॅप्स शेअर करता येणार
Follow us on

नवी दिल्ली : तुमच्या स्मार्टफोनमधून दुसऱ्या स्मार्टफोनवर अ‍ॅप्स पाठविण्यासाठी आता कोणत्याही थर्ड पार्टीची आवश्यकता नाही. आता स्टोअरमधून जवळपासच्या डिव्हाईसमध्ये गूगल प्ले स्टोअरमधून शेअर केले जाऊ शकतात. या फिचरची अधिकृत घोषणा गूगलने डिसेंबरमध्ये केली होती. आता हे फिचर वापरले जाऊ शकते. गुगल प्ले स्टोअरचे हे फिचर कसे वापरायचे जाणून घेऊया. (Apps can now be shared with this new feature of Android)

कसे वापरायचे नविन फिचर?

हे फिचर वापरण्यासाठी, तुमचे गूगल प्ले स्टोअर 24.0 किंवा त्याहून नवीन व्हर्जन असले पाहिजे. Nearby Sharing फिचर वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गूगल प्ले स्टोर ओपन करावे लागेल. त्यानंतर टॉप कॉर्नरवर थ्री लाईन बटनवर क्लिक करा. येथे माय अॅप्स आणि गेम्स ऑप्शनवर जा. तिथे गेल्यावर तुम्हाला अनेक टॅब्स मिळतील. यात एक शेअरचे ऑप्शनही दिले आहे. जर तुम्हाला शेअर ऑप्शन दिसेल नाही तर तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल. गूगल प्ले स्टोरला लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट केल्यामंतर काही वेळाने हे फिचर प्ले स्टोरमध्ये इनेबल होईल. गूगल प्ले स्टोरच्या शेअर टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेंड आणि रिसिव्हचे पर्याय मिळेल. जर तुम्ही एखादे अॅप शेअर करु इच्छित असाल तर सेंड बटनवर क्लिक करा.

कसे डाऊनलोड कराल अॅप्स?

ज्या अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये अॅप पाठवायचे असेल त्या डिव्हाईसमधील रिसिव्ह ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर दोन्ही डिव्हाईसला प्ले स्टोरला लोकेशन अॅक्सेस द्यावे लागेल. सेंडचे ऑप्शन सेलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अॅप्सची लिस्ट दिसेल ती तुम्ही पाठवू शकता. जे अॅप खरेदी केले असतील किंवा अॅप प्ले स्टोरमध्ये उपलब्ध नसतील ते पाठवू शकत नाही. जे सेंड अॅप सेंड करायचे आहे ते सिलेक्ट करुन सेंडवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रिसिव्ह करणाऱ्या डिव्हाईससोबत पेअर करावे लागेल. योग्य डिव्हाईस पेअर झाले आहे का याची खात्री करण्यासाठी रिसिव्हर आणि सेंडर दोघांना एक कोड दर्शविला जातो, ज्याची पुष्टी दोन्ही डिव्हाइस जोडून केली जाऊ शकते. सेंडींग पूर्ण झाल्यानंतर रिसिव्हरला सर्व अॅप्स एक-एक करून किंवा एकाच वेळी इन्स्टॉल करू शकतो. एक एक करून इन्स्टॉल करण्यासाठी युजर जे अॅप इन्स्टॉल करू इच्छिते त्या अ‍ॅपच्या इन्स्टॉल पर्यायावर क्लिक करावे लागेल. आपण सर्व अॅप्स एकत्र इन्स्टॉल करू इच्छित असाल तर इन्स्टॉल ऑलवर क्लिक करावे लागेल. ट्रान्सफर पूर्ण झाल्यानंतर सेंडर किंवा रिसिव्हर कनेक्शन डिस्कनेक्ट करु शकतात. (Apps can now be shared with this new feature of Android)

 

 

इतर बातम्या

Bharat Bandh: मोठी बातमी! देशभरात ‘या’ दिवशी सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहणार; CAIT ची माहिती

IRCTC चं साऊथ इंडिया Tour Package : अवघ्या 25 हजार रुपयांपासून सुरुवात